ढाका : बांग्लादेशच्या क्रिकेट फॅन्सला खऱ्या अर्थानं 'प्रौढ' आणि 'समजूतदार' होण्याची गरज आहे, असं दिसतंय. बांग्लादेश फॅन्सनं आता तर त्यांच्याच कॅप्टनलाही सोडलेलं नाही... आणि त्यामुळेच बांग्लादेशचा कॅप्टन मुर्तजानं आपलं सोशल मीडियावरचं फेसबुक अकाऊंट बंद करून आपला निषेध नोंदवलाय.
नुकत्याच झालेल्या भारत - बांग्लादेश मॅचनंतर बांग्लादेश फॅन्सनं पराभूत झालेल्या भारतीय टीमची खिल्ली उडवली. इतकंच नाही तर त्यांनी आपला 'बालिशपणा' दाखवत सोशल वेबसाईटवर बांग्लादेश टीमच्या खेळाडूच्या बहिणीवरही घाणेरडी टिप्पणी केली.
बांग्लादेशची वेबसाईट 'बीडीन्यूज २४ डॉट कॉम'शी बोलताना कॅप्टन मशरफे मुर्तजा यानं ही गोष्ट स्वत: सांगितलीय. बांग्लादेशचा खेळाडू नासिर हुसैन यानं भारताविरुद्धची श्रृंखला जिंकल्यानंतर घरी परततानाचा आपल्या बहिणीसोबतचा एक फोटो फेसबुकवर शेअर केला होता.
या फोटोवर फॅन्सनं अनेक अश्लील प्रतिक्रिया नोंदवल्या होत्या. त्यानंतर हुसैननं हा फोटो हटवला होता.
याचाच निषेध करत आपल्या सहकारी खेळाडूसोबत उभं राहत कॅप्टन मुर्तजानं आपलं फेसबुक पेजच बंद करून टाकलंय. तसचं सार्वजनिक रुपात अशा प्रतिक्रिया व्यक्त करणाऱ्या फॅन्सचा निषेधही केलाय. 'फेसबुक पेजवर अशा भल्या-बुऱ्या घटनांचा आम्हाला सामना करावा लागत असेल तर मला याची गरज नाही' असं मुर्तजानं म्हटलंय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.