इंग्लंड : इंग्लंडचा फास्ट बॉलर जेम्स अॅंडरसन यांने भारतीय क्रिकेटपटू रवींद्र जडेजाला शिवी देल्याचा आरोप आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने मान्य केला आहे.
रवींद्र जडेजा आणि अॅंडरसन यांच्यात पहिल्या कसोटी सामन्याच्यावेळी वाद निर्माण झाला होता. यावेळी जेम्सने शिवी देल्याचा आरोप केला होता. या आरोपात तथ्य असल्याचे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने म्हटले आहे.
जेम्सने शिवी देऊन रवींद्र जडेजाला धक्का दिल्याचे आयसीसीने मान्य केले आहे. भारताची बॅटींग सुरु असताना गुरुवारी या दोन्ही खेळाडूंमध्यो थोडी बाचाबाची झाली होती.
याबाबत आयसीसीने अॅंडरसनने लेव्हल थ्री के आरोप ठेवले आहेत. त्यामुळे जेम्सला चार ते आठ कसोटी किंवा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये वनडे न खेळण्याची शिक्षा होऊ शकते. दरम्यान, दुसऱ्या आणि तिरसऱ्या कसोटी तो खेळू शकेल. कारण याची सुनावणी अजून झालेली नाही. तसेच या दोन कसोटीच्या आधी होऊ शकणार नाही, त्यामुळे तो कारवाईतून सुटला आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.