बर्लिन : अर्जेन्टीनाचा 1-0 नं पराभव करत चौथ्यांदा वर्ल्ड कप ट्रॉफीवर नाव कोरणा-या जर्मन टीमचं जल्लोषपूर्ण वातावरणात मायदेशात स्वागत करण्यात आलं.
एअरपोर्टवर ज्या विमानाने प्लेअर्स आले त्या विमानाला फायर ब्रिगेडच्या गाड्यांनी पाण्याचे फवारे उडवत सलामी दिली.
जर्मन टीमच्या स्वागतासाठी हजारोंच्या संख्येने जर्मन फॅन्स एअरपोर्टबाहेर जमले असून, वर्ल्ड चॅम्पिन्सची बर्लिनमध्ये मिरवणूक काढण्यात येणार आहे.
तसंच खेळाडूंचं विशेष कार्यक्रमात सत्कार करण्यात येणार आहे.
सबस्टिट्यूट फुटबॉलर म्हणून आलेल्या मारियो गोट्झाने गोल झळकावत जर्मनीच्या वर्ल्ड चॅम्पियनशीपवर शिक्कामोर्तब केलं होतं. 24 वर्षांनी जर्मनी वर्ल्ड चॅम्पियन झाली.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.