झिम्बाब्वेसाठी मराठमोळ्या अजिंक्य राहणेकडे धुरा

 झिम्बाव्बे दौऱ्यासाठी टीम इंडियाची धुरा मराठमोळ्या अजिंक्य रहाणेकडे देण्यात आली आहे. या दौऱ्यात भारतीय संघ ३ वन डे आणि २ टी-२० सामने खेळणार आहेत.

Updated: Jun 29, 2015, 03:10 PM IST
 झिम्बाब्वेसाठी मराठमोळ्या अजिंक्य राहणेकडे धुरा title=

मुंबई :  झिम्बाव्बे दौऱ्यासाठी टीम इंडियाची धुरा मराठमोळ्या अजिंक्य रहाणेकडे देण्यात आली आहे. या दौऱ्यात भारतीय संघ ३ वन डे आणि २ टी-२० सामने खेळणार आहेत.

सचिन तेंडुलकरनंतर पहिल्यांदा भारतीय संघाची धुरा एका मराठी माणसाच्या हाती आली आहे. सचिन तेंडुलकरने भारताची धुरा २००० पर्यंत सांभाळली होतीी. 

या दौऱ्यासाठी कर्णधार महेंद्रसिंग धोनी, विराट कोहली, सुरेश रैना, रोहित शर्मा, शिखर धवन, आर. अश्विन, रविंद्र जडेजा यांना विश्रांती देण्यात आली आहे. 

या दौऱ्यासाठी २०१२ नंतर हरभजन सिंग याला वन डेमध्ये संधी देण्यात आली आहे. 

झिम्बाब्वेसाठी संघ पुढील प्रमाणे - अजिंक्य रहाणे (कर्णधार ), मुरली विजय, रायडू, मनोज तिवारी, केदार जाधव, रॉबिन उथप्पा, मनीष पांडे, हरभजन सिंग, अक्षर पटेल, कर्ण शर्मा, धवल कुलकर्णी, स्टु्अर्ट बिन्नी, भुवनेश्वर कुमार, मोहित शर्मा, संदीप शर्मा  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.