ICC कसोटी रॅंकिंगमध्ये राहणे 8 स्थानावर तर अश्विन टॉप

टीम इंडियाचा कसोटी उपकर्णधार अजिंक्य राहणेने वेस्टइंडीज विरोधात तिसऱ्या कसोटी सामन्यात चांगले प्रदर्शन केल्याने त्याला मोठे बक्षिस मिळाले आहे. आयसीसी कसोटी रॅंकिंगमध्ये राहणे 8 तर आर अश्विन टॉप आहे. राहणेचे हे बेस्ट रॅंकिंग आहे.

Updated: Aug 16, 2016, 05:53 PM IST
ICC कसोटी रॅंकिंगमध्ये राहणे 8 स्थानावर तर अश्विन टॉप title=

मुंबई : टीम इंडियाचा कसोटी उपकर्णधार अजिंक्य राहणेने वेस्टइंडीज विरोधात तिसऱ्या कसोटी सामन्यात चांगले प्रदर्शन केल्याने त्याला मोठे बक्षिस मिळाले आहे. आयसीसी कसोटी रॅंकिंगमध्ये राहणे 8 तर आर अश्विन टॉप आहे. राहणेचे हे बेस्ट रॅंकिंग आहे.

वेस्टइंडीजविरोधात तिसऱ्या कसोटी सामन्यात राहणे पाकिस्तानचा खेळाडू यूनुस खान याच्यासह 11 व्या स्थानावर होता. राहणे यांने तिसऱ्या कसोटी पहिल्या डावात 35 रन्स आणि दुसऱ्या डावात 78 रन्स केले. तसेच भारताला 237 रन्सने जिंकण्याची महत्वाची भूमिका बजावली. भारतने मालिकेत 2-0ने आघाडी घेतली. तर पाकिस्तानचा यूनुस खानने सहावे दुहेरी शतक ठोकत टॉप फलंदाज ठरण्यात यश मिळविले. त्याने इंग्लंडविरोधात चौथ्या आणि शेवटच्या कसोटीत 218 रन्स केल्यात.

ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टिव्हन स्थिम हा कसोटी रॅंकिंगमध्ये टॉप आहे. न्यूझीलंडचा रॉस टेलर याने झिम्बाव्बेविरोधात 124 आणि 67 रन्स करत टॉप 10 मध्ये आपले स्थान पक्के केले. तो 9व्या स्थानावर आहे. तर गोलंदाज यांच्या रॅंकिंगमध्ये खास करुन बदल दिसून आला नाही. न्यूझीलंडच्या नील वॅगनरला एका स्थानाच लाभ झालाय. तो 13 व्या स्थानावर आलाय. तर इंग्लंडचा क्रिस वोक्स याला दोन स्थानाचा लाभ होऊन तो 18 व्या स्थानावर आलाय.

पाकिस्तानचा वहाब रियाज आणि सोहेल खान यांच्याशिवाय वेस्टइंडीजचा मिग्युएल कमिंस याला रॅंकिंगचा लाभ झालाय. रियाजने 6 स्थानाचा लाभ मिळून तो 27 स्थानवर आलाय. तर सोहेल याला 21 स्थानाच लाभ मिळून तो 41 स्थानावर आलाय. भारताचा रविचन्द्रन अश्विन हा टॉपवर आहे. ऑस्ट्रेलियाचा मिशेल स्टार्कने दोन स्थान मिळवून पहिल्या पाच खेळाडूत आपली जागा पटकावली आहे.