जे विराटला जमलं नाही... ते 'कॅप्टन' अजिंक्यनं करून दाखवलं

अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली टीम इंडियानं धर्मशाळा टेस्टमध्ये  ऑस्ट्रेलियाला आठ विकेटनं पछाडलं. याचबरोबर अजिंक्य रहाणेनं एक रेकॉर्ड आपल्या नावावर केलाय. 

Updated: Mar 28, 2017, 01:27 PM IST
जे विराटला जमलं नाही... ते 'कॅप्टन' अजिंक्यनं करून दाखवलं title=

धर्मशाला : अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली टीम इंडियानं धर्मशाळा टेस्टमध्ये  ऑस्ट्रेलियाला आठ विकेटनं पछाडलं. याचबरोबर अजिंक्य रहाणेनं एक रेकॉर्ड आपल्या नावावर केलाय. 

उल्लेखनीय म्हणजे, आपल्या पदार्पणातच अजिंक्यनं जे करून दाखवलंय... ते आक्रमक अशी ओळख असलेल्या विराटलाही करता आलं नव्हतं. या रेकॉर्डसोबत रहाणेनं सुनील गावसकर, सचिन तेंडुलकर आणि महेंद्रसिंग धोनी यांची बरोबरीही केलीय. 

आपल्या कॅप्टन्सीमध्ये पहिलीच मॅच जिंकणारा अजिंक्य नववा भारतीय कॅप्टन ठरलाय.

यापूर्वी, महेंद्र सिंग धोनीनं दक्षिण आफ्रिकेच्या विरुद्ध सीरिजच्या तिसऱ्या आणि शेवटच्या टेस्टमध्ये पहिल्यांदा कॅप्टन्सीची धुरा आपल्या खांद्यावर घेतली होती. याही मॅचमध्ये टीम इंडियानं आठ विकेटसनं दक्षिण आफ्रिला पछाडलं होतं. 

यापूर्वी, पॉली उमरीगर, सुनील गावरकर, रवी शास्त्री आणि सचिन तेंडुलकर या मुंबईच्या चार खेळाडुंनी आपल्या कॅप्टन्सीच्या पहिल्याच मॅचमध्ये टीम इंडियाला विजय मिळवून दिला होता.