दमदार बँटिंग सोबतच एक चांगला डॉक्टर आहे एबी डिविलियर्स

सर्व बॉलर्सना लोळवणारा दमदार बॅट्समन एबी डिविलियर्स... त्याच्या बॅटिंगचे तर आपण फॅन्स आहोतच... पण एक चांगला डॉक्टर सुद्धा आहे एबी डिविलियर्स...

Updated: Oct 28, 2015, 02:32 PM IST
दमदार बँटिंग सोबतच एक चांगला डॉक्टर आहे एबी डिविलियर्स title=

मुंबई: सर्व बॉलर्सना लोळवणारा दमदार बॅट्समन एबी डिविलियर्स... त्याच्या बॅटिंगचे तर आपण फॅन्स आहोतच... पण एक चांगला डॉक्टर सुद्धा आहे एबी डिविलियर्स...

डिविलियर्सचे वडील पण आहेत एबी डिविलियर्स

गेल्या रविवारी वानखेडे स्टेडियमवर सर्व बॉल्स बाउंड्रीबाहेर घालवणारा डिविलियर्स आपण पाहिलाय. पण जेव्हा वानखेडे स्टेडियमवर एबी डिविलियर्स बॉलर्सची धुलाई करत होता...

आणखी वाचा - टीम इंडियाचा २१४ रन्सने लाजीरवाणा पराभव

तेव्हा हजारों किलोमीटर दूर साउथ आफ्रिकेच्या एका हॉस्पिटलमध्ये ऑपरेशन थिएटरमध्ये एका लहान जीव जगात आणण्याचं कामही एबी डिविलियर्स यांनी केलं.

एक जण बॅटिंग तर दुसरा करत होता ऑपरेशन

आपण खरं तेच वाचत आहात...पहिला एबी जेव्हा भारतीय बॉलर्सना फटके मारत होता. तेव्हा दुसरे सिजेरियन ऑपरेशन करून एका मुलाला जन्माला घालत होते. खरंतर एबी डिविलियर्सच्या वडिलांचं नावही एबी डिविलियर्स आहेत. ते एक जनरल फिजिशियन आणि सर्जन आहेत. दक्षिण आफ्रिकेच्या लिम्पोपो राज्यातील सेंट विंसेट हॉस्पिटलमध्ये कार्यरत आहेत. पापा डिविलियर्स आपलं कर्तव्य पार पाडत होते. आपल्या कर्तव्यामुळे त्यांनी 'मिस्टर ३६०'ची धुवाधार बॅटिंग मिस केली. पण डिविलियर्सच्या आईनं मात्र मुलाच्या बॅटिंगचा आनंद लुटला.

भारतात येणार डिविलियर्सचं कुटुंब

मिळालेल्या माहितीनुसार डिविलियर्सचं कुटुंब आपल्या लाडक्या मुलाच्या १०० व्या टेस्ट मॅचसाठी भारतात येणार आहे. भारत दौऱ्यावर आलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या टीमला चार टेस्ट मॅचच्या सीरिजमध्ये जेव्हा दुसरी टेस्ट खेळेल. ती डिविलियर्सची १०० टेस्ट मॅच असेल. बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर ही मॅच होणार आहे. 

आणखी वाचा - LIVE स्कोअरकार्ड: भारत वि. दक्षिण आफ्रिका (पाचवी वनडे)

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.