डर्बन : भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीचा वेगवान ८ हजार धावा बनविण्याचा विक्रम मोडीत निघाला आहे. कारण दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार एबी डिव्हिलर्सने एकदिवसीय क्रिकेटमध्ये ८ हजार धावांचा टप्पा पार केला.
डिव्हिलर्सने १८२ डावांत ही कामगिरी केली आहे. तर, गांगुलीने २०० डावांमध्ये ८ हजार धावा पूर्ण केल्या होत्या. डर्बनमध्ये न्यूझीलंडविरुद्ध बुधवारी झालेल्या एकदिवसीय सामन्यात डिव्हिलर्सने हा रेकॉर्ड केला.
डिव्हिलर्सच्या नावावर यापूर्वी एकदिवसीय क्रिकेटमध्ये वेगवान अर्धशतक, शतक आणि दीडशतकाचे विक्रम नोंद आहेत. डिव्हिलर्सने गांगुलीपेक्षा १८ आणि सचिन तेंडुलकरपेक्षा २८ डावांपूर्वीच हा टप्पा पार केला आहे.
डिव्हिलर्सने जानेवारी २०१५ मध्ये जोहान्सबर्गमध्ये झालेल्या सामन्यात वेस्ट इंडीजविरुद्ध १६ चेंडूत अर्धशतक झळकाविले होते. त्याच सामन्यात त्याने ३१ चेंडूत शतक झळकाविण्याचाही मान मिळविला होता. न्यूझीलंडच्या कोरे अँडरसनच्या नावावर यापूर्वी वेगवान शतक करण्याचा विक्रम होता.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.