भारताचा दणदणीत विजय, रोहितचा विश्वविक्रम

रोहित गुरूनाथ शर्मा. भारताचा नवा विक्रमवीर. वन डे क्रिकेटमध्ये भारताच्या या पठ्ठ्याने आज दुसरं द्विशतक झळकावलंच पण त्याचबरोबर रोहितने एका इनिंगमध्ये सर्वाधिक म्हणजे 264 धावांचा रेकॉर्ड केलाय. शिवाय भारताने मालिका खिशात टाकत 153 ने विजय मिळवला.

Updated: Nov 13, 2014, 10:29 PM IST
भारताचा दणदणीत विजय, रोहितचा विश्वविक्रम title=

कोलकाता : रोहित गुरूनाथ शर्मा. भारताचा नवा विक्रमवीर. वन डे क्रिकेटमध्ये भारताच्या या पठ्ठ्याने आज दुसरं द्विशतक झळकावलंच पण त्याचबरोबर रोहितने एका इनिंगमध्ये सर्वाधिक म्हणजे 264 धावांचा रेकॉर्ड केलाय. शिवाय भारताने मालिका खिशात टाकत 153 ने विजय मिळवला.

भारताने 405 रन्सचे दिलेले आव्हान लंकेला झेलता आले नाही. लंकेचे सर्व खेळाडू 251 रन्सवर बाद झाले. श्रीलंकेचे तीन फलंदाज झटपट आऊट झालेत. चंडिमल, परेरा आणि जयवर्दनेला भारतीय बॉलरनी आपल्या भेदक माऱ्याच्या जोरावर माघारी पाठविले.

रोहित शर्माने भारतातर्फे सलामीला येत 173 चेंडूत 33 चौकार आणि 9 षटकार खेचत 264 रन्स केल्या. रोहितच्या या धमाकेदार द्विशतकी खेळीमुळे तब्बल 405 धावांचं टार्गेट श्रीलंकेसमोर ठेवलं. एका इनिंगमध्ये 264 रन्स आणि वन डे मध्ये दोन डबल सेंचुरी असे दोन रेकॉर्ड रोहीतने एकाच इनिंगमध्ये आपल्या नावावर केले.

वनडे क्रिकेटमध्ये दोनवेळा डबल सेन्चुरी करणारा रोहित शर्मा हा पहिलाच क्रिकेटपटू ठरलाय. 2 नोव्हेंबर 2013 रोजी बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर ऑस्ट्रेलियाविरूद्ध रोहितनं पहिली डबल सेन्चुरी ठोकली होती. तर आज श्रीलंकेविरूद्ध कोलकाताच्या इडन गार्डनवर श्रीलंकेविरूद्ध रोहितनं दुसरी डबल सेन्चुरी झळकावली. वनडेमध्ये सर्वाधिक 264 धावांचा रेकॉर्डही त्यानं यावेळी केला.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.