महाराष्ट्रातील २ खेळाडूंची भारतीय क्रिकेट संघात निवड

शार्दुल ठाकूरची भारतीय क्रिकेट टीममध्ये निवड झाल्यानंतर त्याच्या घरी आनंदाचं वातारवण आहे. शार्दुलच्या मेहनतीला फळ मिळाल्याची प्रतिक्रिया त्याच्या आईनं दिली आहे. तर आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्याचं स्वप्न सत्यात उतरवल्याची भावना त्याच्या वडिलांनी व्यक्त केली आहे. 

Updated: May 23, 2016, 09:32 PM IST
महाराष्ट्रातील २ खेळाडूंची भारतीय क्रिकेट संघात निवड title=

मुंबई : शार्दुल ठाकूरची भारतीय क्रिकेट टीममध्ये निवड झाल्यानंतर त्याच्या घरी आनंदाचं वातारवण आहे. शार्दुलच्या मेहनतीला फळ मिळाल्याची प्रतिक्रिया त्याच्या आईनं दिली आहे. तर आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्याचं स्वप्न सत्यात उतरवल्याची भावना त्याच्या वडिलांनी व्यक्त केली आहे. 

गेली अनेक वर्षे विविध स्तरावर सातत्यानं चांगली कामगिरी करणाऱ्या नागपूरच्या फैझ फझलची भारतीय संघात वर्णी लागली. झिम्बाब्वे दौ-यासाठी फैजची भारतीय संघात निवड झाली आणि तो राहतो त्या मेंहंदीबाग कॉलनीत एकच आनंदोत्सव सुरु झाला. कठोर परिश्रमामुळे भारतीय संघात स्थान मिळण्याचे फैजचे स्वप्न पूर्ण होऊ शकले अशी प्रतिक्रिया वडिल याकूब फजल यांनी दिली. 

फैज काऊंटी क्रिकेट खेळण्याकरता सध्या इंग्लंडमध्ये आहे. गेल्या अनेक वर्षांपासून विदर्भाकरता सातत्यपूर्ण कामगिरी करणा-या फैज फझलसाठी अखेर टीम इंडियाचे दार उघडले. भारताकडून अंडर-१७ टीममध्ये श्रीलंकेत ट्राय सीरिज खेळल्यानंतर फैजची निवड बांग्लादेशमध्ये झालेल्या अंडर १९ वर्ल्ड कपसाठीही झाली होती. मात्र त्याचे स्वप्न होते टीम इंडियाकडून खेळण्याचे. त्याकरता तो कठोर परिश्रम घेत होता.

विदर्भाकडून खेळताना त्याची कामगिरी लक्षवेधी ठरली. याशिवाय देशात होणाऱ्या विविध स्पर्धांमध्ये त्याची कामगिरी बोलकी होती. सध्या इंग्लंडमध्ये काऊंटी क्रिकेट सामन्यात व्यस्त असलेला फैझ तिथेही चांगली कामगिरी करीत आहे. आज त्याची भारतीय संघात निवड झाल्यानंतर कुटुंबियांचा आनंद गंगनात मावत नव्हता. आई-वडिलांना अभिनंदनांचे सतत फोन येत होते.