अरमान करणार २०१४मध्ये लग्न, पण तनिषाचं काय?

रिअॅलिटी शो बिग बॉस- ७च्या घरातून बाहेर काढण्यात आलेल्या अरमान कोहलीनं एका वृत्तवाहिनीसोबत बोलतांना सांगितलं की, पुढच्या वर्षी मी लग्न करणार आहे. म्हणजेच अरमान कोहली २०१४मध्ये लग्न करण्याचा प्लान करतोय. मात्र अरमान अभिनेत्री काजोलची बहिण तनिषा मुखर्जी बरोबरच लग्न करणार का? हे कोडंच आहे.

Updated: Dec 23, 2013, 01:40 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
रिअॅलिटी शो बिग बॉस- ७च्या घरातून बाहेर काढण्यात आलेल्या अरमान कोहलीनं एका वृत्तवाहिनीसोबत बोलतांना सांगितलं की, पुढच्या वर्षी मी लग्न करणार आहे. म्हणजेच अरमान कोहली २०१४मध्ये लग्न करण्याचा प्लान करतोय. मात्र अरमान अभिनेत्री काजोलची बहिण तनिषा मुखर्जी बरोबरच लग्न करणार का? हे कोडंच आहे.
तनिषा ही सध्या बिग बॉस ७च्या घरात आहे. बिग बॉसच्या घरात अरमान आणि तनिषा या दोघांचं नातं अतिशय प्रेमळ होतं. लग्नाबाबत अरमानला प्रश्न विचारला असता अरमाननं म्हटलं, मी आता ४० वर्षाचा झालो आहे आणि त्यामुळं माझ्या मते लग्नासाठी हे वय योग्य आहे. मात्र तो कोणाशी लग्न करणार आहे हे अरमाननं गुपीत ठेवला आहे. यावेळी अरमाननं स्पष्ट केलंय की, तनिषा ही माझी जवळची मैत्रीण आहे. बिग बॉसच्या घरात मी आणि तनिषा काही चुकीच्या क्रिया करताना पकडल्या गेलो या सर्व अफवा आहे. बिग बॉसच्या घरात माझ्यात आणि तनिषात असं काहीही झालेलं नाही, असं अरमाननं स्पष्टपणे सांगितलं. त्यानंतर तो म्हणाला, बिग बॉस सीजन-७ तनिषाच जिंकेल.
सोफिया बरोबर झालेल्या वादावर अरमान कोहलीनं सांगितलं की, सोफियावर मी खूप चिडलेलो आहे. सलमान खाननं अरमानची बाजू घेण्यावर अरमाननं म्हटलं असं काही नाही सलमान खाननं माझी बाजू घेतलेली नाही. तसंच मी महिलांचा खूप आदर करतो. यापुढं काही चित्रपटात तो खलनायकाची भूमिका बजावणार आहे. त्यामुळं मला सलमान भाईच्या मदतीची गरज आहे, असंही अरमाननं सांगितलं.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.