बिग बॉस : गौहर-कुशालमध्ये वादाची ठिणगी

‘बिग बॉस सिझन ७’चा शेवट आता जवळ आलाय... अर्थातच, या शोमध्ये काही स्पर्धकांवर चढलेला प्रेमाचा रंगही निवळताना दिसतोय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Dec 18, 2013, 09:03 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
‘बिग बॉस सिझन ७’चा शेवट आता जवळ आलाय... अर्थातच, या शोमध्ये काही स्पर्धकांवर चढलेला प्रेमाचा रंगही निवळताना दिसतोय. नुकत्याच झालेल्या एका भागात, या रिअॅलिटी शोमध्ये लव्हबर्डस कुशाल-गौहरमध्ये जोरदार भांडण झालेलं दिसलं.
त्याचं झालं असं की, काम्या पंजाबी घरातून बाहेर पडल्यानंतर घरातील उरलेल्या सदस्यांना थोडं चिअरअप करण्यासाठी बीग बॉसनं सदस्यांना संगीतावर ताल धरायला लावला. दमदार सदस्य समजल्या जाणाऱ्या काम्याचं घराबाहेर जाणं, घरातल्या काही सदस्यांना अजून पचलेलं नाही.
तनिषा, अरमान, अँन्डी, संग्राम, गौहर, कुशाल आणि एजाझ गार्डन एरियामध्ये एकत्र झाले... त्यानंतर अरमान, कुशाल आणि एजाझ हे सोडून बाकी सगळ्यांनी संगीतावर ताल धरला... तेव्हा गौहरनं एजाझला नाचण्यासाठी बोलावलं... आणि झालं... कुशाल चिडला.... कुशाल तिथून निघून गेला त्यानं गौहरबरोबर डान्ससाठीही नकार दिला. एजाझला तिनं बोलावायला नको होतं, असं कुशालचं म्हणणं होतं... त्यामुळे गौहरही चिडली आणि दोघांमध्ये चांगलाच वाद झाला. कुशाल ओव्हर रिअॅक्ट करतोय, हे काही चिडण्यासाठी कारण असू शकत नाही, असं गौहरनं म्हटलं.
यावर, अँन्डीशी बोलताना एजाझनं ‘गौहर कुशालसोबत नात्यात राहून स्वत:ला नुकसान पोहचवतेय’ असं म्हटलं. त्यावेळी अँन्डीनं एजाझला समजावत, गौहर आणि कुशालला त्यांच्या दोघांच्या व्यक्तिगत मुद्यांमध्ये दुसऱ्या कुणी तोंड घातलेलं आवडणार नाही, असं समजावलं.
दरम्यान, गौहर-कुशालचं भांडण निवळलं होतं... एजाझनं आपलं म्हणणं दोघांसमोर मांडण्याचा प्रयत्न केला. पण, दोघांनीही एजाझला आपल्या व्यक्तिगत भांडणापासून दूर राहण्यास सांगितलं.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.