www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
रिअॅलिटी शो बिग बॉसमध्ये आता ‘बिग फाईट’ पाहायला मिळतेय. यंदाच्या सीझनमधल्या स्पर्धकांमध्ये अरमान कोहली भांडखोर आणि अधिक रागीट स्वभावासाठी चांगलाच चर्चेत आलाय.
आत्तापर्यंत अरमान कोहलीच्या रागासमोर जवळजवळ सर्वच स्पर्धकांना सामोरं जावं लागलंय. मंगळवारी एका टास्कदरम्यान अरमान कोहलीनं अँन्डीला निशाना बनवून त्याला गलिच्छ शिव्यांची लाखोली वाहिली. अँन्डीनं त्याला हात दाखवत चूप राहणं पसंत केलं... पण अरमान मात्र शांत झाला नाही. त्यानं अँन्डीला ‘छक्का’ आणि ‘तोतरा’ही म्हणून टाकलं. शिव्यांमुळे अँन्डी मात्र खुपच नर्व्हस झाला होता.
याअगोदरच्या भागात अरमाननं काम्याला ‘डिवोर्सी’ (नवऱ्यानं टाकलेली) म्हटलं होतं. त्यामुळे काम्या खूपच नाराज झाली होती. असं म्हणण्याचा कुणालाही अधिकार कुणालाही नाही, असं तिनं तणतणत म्हटलं. अरमानला आपली चूक लक्षात आल्यानंतर तो काम्याजवळ माफी मागण्यासाठीही गेला. बाथरूमबाहेर उभी असलेल्या काम्याचे पाय पकडण्यापर्यंत तो गेला होता. पण, शेवटी काम्यानं त्याला माफ केल्याचं म्हटलं.
टास्क दरम्यान एक स्पर्धक एली अब्राहम हिच्या डोक्यावर जखमही झाली होती, त्याला कारणीभूत अरमानच ठरला होता. अरमानच्या रागाला शांत करण्यासाठी अपूर्व अग्निहोत्री आणि तनिषानं खूप प्रयत्न केला परंतु अरमान ओरडतच राहिला... आणि मला यावेळेस एकटं सोडा, असं त्यानं सगळ्यांना सांगितलं. अरमानच्या रागाच्या आणि इतर स्पर्धकां दरम्यान तनिषा अनेक वेळा आडवी पडल्याचं दिसलं.
आता या कार्यक्रमाची खरी सुरूवात झाली असं प्रेक्षकांना वाटतंय. कारण, स्पर्धकांमध्ये राग, भांडण, ग्रुपिंग यांचा तडका लागतोय आणि या विचित्र खेळाला रंगही चढतोय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.