संजय दत्तला जेलमध्ये घरचं जेवण, मान्यता भेटणार

१९९३च्या मुंबई बॉम्बस्फोटात दोषी ठरलेला अभिनेता संजय दत्त आज कोर्टाला शरण गेला. त्यामुळे टाडा कोर्टाची कारवाई संपलीय, आता ऑर्डरची प्रतीक्षा आहे. संजय दत्तला एका महिन्यासाठी जेलमध्ये घरचं जेवण मिळणार आहे, त्याचबरोबर मान्यताही त्याला जेलमध्ये भेटू शकणार आहे.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: May 16, 2013, 04:59 PM IST

www.24taas.com,झी मीडिया,मुंबई
१९९३च्या मुंबई बॉम्बस्फोटात दोषी ठरलेला अभिनेता संजय दत्त आज कोर्टाला शरण गेला. त्यामुळे टाडा कोर्टाची कारवाई संपलीय, आता ऑर्डरची प्रतीक्षा आहे. संजय दत्तला एका महिन्यासाठी जेलमध्ये घरचं जेवण मिळणार आहे, त्याचबरोबर मान्यताही त्याला जेलमध्ये भेटू शकणार आहे.
घरचं पांघरुण, उशी आणि औषधं जेलमध्ये ठेवण्याची परवानगी संजय दत्तला मिळालीय. मला येरवडा जेलमध्ये पाठवा, अशी विनंती संजयनं कोर्टाला केलीय. त्याचबरोबर इलेक्ट्रॉनिक सिगारेट नेण्याचीही परवानगी द्या, अशी मागणी संजय दत्तनं केलीय. सिगारेटची मागणी सोडून संजय दत्तच्या सगळ्या मागण्या मान्य झाल्यायत.
जेलमध्ये काय होणार मुन्नाभाईचं. संजय दत्तला व्हीआयपी कैद्याचा दर्जा मिळणार की सर्वसामान्य कैद्यांसारखाच राहणार. या प्रश्नाचं उत्तर आहे, संजय दत्त सर्वसामान्य कैद्यासारखाच राहणार. पहिल्याच दिवसापासूनच याची सुरुवात होणार आहे. जेलमध्ये जाताच संजय दत्तला कैदी नंबर मिळेल. त्यानंतर कैद्यांसाठी असलेलं गरजेचं सामान आणि कपडे देण्यात येतील. इतर कैद्यांप्रमाणेच संजय दत्तलाही कुरता आणि पायजम्याचे दोन जोड, एक टोपी आणि एक ब्लँकेट दिलं जाईल. हेच कपडे त्याला सहा महिने वापरावे लागतील.

संजय दत्तला जेलमध्ये सकाळी सहा वाजता उठावंच लागणार आहे. सकाळी सहा ते संध्याकाळी सहाच्या दरम्यान जेलच्या आवारात फिरता येणार आहे. पण त्यावेळी त्याला इतर कैद्यांबरोबर कामही करावं लागणार आहे. साक्षर कैद्यांमध्ये संजय दत्तची गणना होणार आहे. सिनेमाच्या एखाद्या सीनसाठी लाखो रुपये घेणाऱ्या संजूबाबाला जेलमध्ये रोजंदारी म्हणून दररोज ३५ रुपये मिळणार आहेत. या पैशांमधून त्याला हव्या त्या वस्तू तो जेलच्या कॅण्टीनमधून घेऊ शकतो. महिन्याकाठी त्याला जेमतेम पंधराशेंचा खर्च करता येणार आहे.
संजयला सकाळी उठल्यावर जेलमध्ये चहा मिळेल. त्यानंतर नाश्त्यासाठी पोहे, इडली आणि उपमा असे तीन ऑप्शन्स असणार आहेत. तर जेवणामध्ये रोटी, भाजी, वरण आणि भात मिळणार आहे. तर रविवारच्या जेवणात तूप आणि मिठाई दिली जाईल. आतापर्यंत फिल्मी दुनियेसारखंच आयुष्य जगणा-या संजूबाबाला आता जेलमधल्या खडतर आयुष्याला सामोरं जावं लागणार आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.