सचिनच्या २०० व्या टेस्ट मॅचसाठी कडेकोट बंदोबस्त

सचिनच्या २०० व्या टेस्ट मॅचसाठी मुंबई पोलीसही सज्ज झालेत. या टेस्ट मॅचसाच्या सुरक्षा संदर्भात मुंबई पोलिसांच्य स्पेशल टीमनं एमसीए बरोबर एक बैठकही केलीये. या बैठकीत सचिनच्या २०० व्या टेस्ट मॅचच्या सुरक्षे संबंधी महत्वपूर्ण चर्चा झाली

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Nov 6, 2013, 11:28 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
सचिनच्या २०० व्या टेस्ट मॅचसाठी मुंबई पोलीसही सज्ज झालेत. या टेस्ट मॅचसाच्या सुरक्षा संदर्भात मुंबई पोलिसांच्य स्पेशल टीमनं एमसीए बरोबर एक बैठकही केलीये. या बैठकीत सचिनच्या २०० व्या टेस्ट मॅचच्या सुरक्षे संबंधी महत्वपूर्ण चर्चा झालीय. पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार २०११ साली मुंबईत वर्ल्डकपच्या वेळी ज्या पद्धतीची सुरक्षा व्यवस्था लावण्यात आली होती त्याच धरतीवर या टेस्ट मॅचसाठी सुरक्षा चोख ठेवण्यात येणारयं. पाहुयात यावरच एक स्पेशल
आपल्या सचिनची २०० वी टेस्ट मॅच १४ ते १८ नोव्हेंबरच्या दरम्यान मुंबईतल्या वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. सचिनची शेवटची टेसट म्हणजे मुंबईकरांसाठी एक उत्सवच आहे. या उत्सवाला कुठे गालबोट लागू नये यासाठी मुंबई पोलीस या टेस्ट मॅचसाठी कडक पोलीस बंदोबस्त करणार आहेत. कारण सचिनची ही शेवटची टेस्ट मॅच पहायला जगभरातून व्हि व्हि आय पी येणार आहेत.त्यासाठी वानखेडे स्टेडिअम सकाळी आठ ते रात्री साडे आठपर्यंत मंबई पोलीसांच्या ताब्याच असणारयं. रात्री साठे आठनंतर स्टेडिअम मध्ये कोणालाही प्रवेश दिला जाणार नाहीए.
या २०० व्या टेस्ट मॅचच्या वेळेस वानखेडे स्टेडिअम आणि जवळच्या भागाला छावणीचे स्वरुप देण्यात आलंय. १००० पोलीस स्टेडिअमच्या आत आणि बाहेर सुरक्षेसाठी ठेवण्यात येणार आहे. त्याच बरोबर राज्य राखीव दल, शिघ्र कृती दल आणि दंगल नियंत्रक दलांच्या तुकड्या देखील वानखेडे स्टेडियमला घेराव घालणारेत. स्टेडिअममध्ये येणा-या प्रत्येकाची तपासणी केली जाईल आणि ओळखपत्र असल्याशिवाय कोणालाही स्टेडिअमच्या आत सोडलं जाणार नाही. एवढचं नाही तर स्टेडिअम मध्ये कोणतिही वस्तू नेण्यास बंदी घालण्यात आलीये.

सचिनच्या २०० व्या टेस्ट मॅचमध्ये घातपाताची कोणतीही माहिती पोलीसांकडे नाही. पण, एक दक्षता म्हणून टीम इंडियाच्या सुरक्षेसाठी स्पेशल क्यु आर टी, कॉम्बॅट व्हॅन आणि स्पेशल पोलीस असं सुरक्षा चक्र तयार केलं जाणारेय. आणि त्याचबरोबर या २००व्या टेस्ट मॅचसाठी सचिनचे फॅनही मुंबईत ठिकठिकाणी जल्लोष साजरा करणार असून त्या दृष्टीनं ही पोलीसांनी मुंबईत सुरक्षा व्यवस्था लावलीये.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.
पाहा व्हिडिओ
सावधान...एटीएममध्ये भलत्याच नोटा!
अधिक वाचा - http://bit.ly/HJkFmF