www.24taas.com, झी मीडिया, कोलकाता
कोलकात्याच्या ईडन गार्डनवर सुरू असलेली वेस्ट इंडिज विरुद्ध भारताची टेस्ट मॅचची उत्सुकता प्रचंड ताणली गेली होती... त्याचं कारण म्हणजे मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची ही आपल्या करियरमधील १९९ वी टेस्ट मॅच आहे. परंतु, मैदानात दाखल झालेला सचिन अवघ्या १० रन्सवर आऊट झाला आणि प्रेक्षकांची प्रचंड निराशा झाली. क्रिकेट फॅन्सची ही निराशा त्यांच्या चेहऱ्यावरून सरळ सरळ व्यक्त होत होती.
चेतेश्वर पुजाराच्या (१७ रन्स) विकेटनंतर सचिनसोबत खेळण्यासाठी विराट कोहली मैदानात दाखल झाला. त्यानंतर थोड्याच वेळात शेन शिलिंगफोर्डला सचिनचा बदला घेण्याची संधी मिळाली. बुधवारी, झालेल्या वेस्ट इंडिजच्या पहिल्या इनिंगमध्ये सचिननंच शिलिंगफोर्डला `एलबीडब्ल्यू` उडवलं होतं... आज शिलिंगफोर्डनंही सचिनला `एलबीडब्ल्यू` उडवलं. थोड्या दबावाखाली मैदानात दाखल झालेला सचिननं १० रन्सवर (२४ बॉल्स) बाद झाला. शेन शिलिंडफोर्डला एलबीडब्ल्यू करत सचिनने आपल्या करियरमधील २०० वी विकेट घेण्याची किमया केली होती.
सचिन बाद झाल्यामुळे प्रेक्षकांची आणि सचिनच्या चाहत्यांची प्रचंड निराशा झाली. फक्त सचिनला पाहण्यासाठीच मैदानात दाखल झालेल्या चेहऱ्यांवर ही निराशा स्पष्टपणे दिसून आली. ईडन गार्डनवर सचिनची ही १३ वी टेस्ट मॅच आहे. एकाच मैदानावर १३ कसोटी खेळणारा तो पहिला भारतीय क्रिकेटपटू ठरला आहे.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.