<b> 'मास्टर ब्लास्टर'चा ऑटोग्राफ मिळवायचाय, तर... </b>

लवकरच मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर रिटायर होतोय... त्याची शेवटची मॅच पाहण्यासाठी आणि त्याचा ऑटोग्राफ घेण्यासाठी कित्येक चाहते आशेवर आहेत...

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Nov 7, 2013, 08:30 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
लवकरच मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर रिटायर होतोय... त्याची शेवटची मॅच पाहण्यासाठी आणि त्याचा ऑटोग्राफ घेण्यासाठी कित्येक चाहते आशेवर आहेत... सगळ्यांनाच ऑटोग्राफ देणं सचिनला शक्य होणार नाही, हे बीसीसीआयही जाणून आहे पण यामुळे क्रिकेटचे आणि खासकरून सचिनचे चाहते नाराज होऊ नयेत, यासाठी बीसीसीआयनं एक अनोखं अभियान सुरू केलंय. त्यामुळे तुम्हीही सचिनचा ऑटोग्राफ अगदी सहजरित्या घेऊ शकाल.
सचिनच्या फोटोवर तुमच्यासाठी एक मॅसेज आणि त्याचा ऑटोग्राफ या अभियानामार्फत तुम्हाला अगदी सहज प्राप्त होणार आहे. बीसीसीआयचे सचिव संजय पटेल यांनी ही माहिती दिलीय. बीसीसीआयनं ट्विटरवर संयुक्तपणे हा उपक्रम राबवायला सुरुवात केलीय. यामुळे जगभरातील सचिनच्या चाहत्यांना सचिनचे आभारही मानता येणार आहेत आणि सचिनचा ऑटोग्राफही मिळणार आहे... या अभियानात केवळ सामान्य चाहते आहेत असं समजू नका कारण युवराज सिंह आणि गौतम गंभीर यांसारखे खेळाडूही या अभियानात सामील झालेत. बुधवारी कोलकाता टेस्टपासून सुरू झालेलं हे अभियान सचिनच्या शेवटच्या टेस्ट मॅचपर्यंत म्हणजे मुंबई टेस्ट मॅचपर्यंत सुरू राहील.

असा मिळवाल सचिनचा ऑटोग्राफ…
 सचिनचा ऑटोग्राफ मिळवण्यासाठी तुमचं ट्विटर अकाऊंट असणं गरजेचं आहे.
 ट्विटर अकाऊंटवरून सचिनची प्रशंसा करणारा मॅसेज बीसीसीआयला पाठवा. ट्विटर मेसेज बॉक्समध्ये लिहा @BCCI तुमचा मेसेज लिहा.
 या मॅसेजमध्ये #ThankYouSachin हा हॅश टॅग लावण्यास विसरू नका.
 त्यानंतर लगेचच बीसीसीआयकडून तुम्हाला एक मॅसेज येईल त्या लिंकवर क्लिक करा.
 या मॅसेजमधून सचिनचा फोटो, मॅसेज आणि त्याचा ऑटोग्राफ असलेला फोटो तुम्हाला मिळेल.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.