निवृत्तीनंतर काय करणार सचिन, श्रीनाथला काळजी

वानखेडे स्टेडियमवर आपली २००वी टेस्ट मॅच खेळून क्रिकेटमधून निवृत्त होणारा सचिन तेंडुलकर निवृत्तीनंतर काय करणार, याची काळजी भारतीय क्रिकेट टीमचा माजी गोलंदाज जवागल श्रीनाथनं व्यक्त केलीय.

Aparna Deshpande Aparna Deshpande | Updated: Nov 12, 2013, 10:48 PM IST

www.24taas.com, वृत्तसंस्था, मुंबई
वानखेडे स्टेडियमवर आपली २००वी टेस्ट मॅच खेळून क्रिकेटमधून निवृत्त होणारा सचिन तेंडुलकर निवृत्तीनंतर काय करणार, याची काळजी भारतीय क्रिकेट टीमचा माजी गोलंदाज जवागल श्रीनाथनं व्यक्त केलीय.
ज्यानं आपल्या आयुष्यात क्रिकेटशिवाय दुसरा विचार केला नाही, त्या सचिनला क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर जे रिकामंपण जाणवेल त्याची काळजी वाटते, असं श्रीनाथ म्हणाला.
२४ वर्ष क्रिकेट खेळल्यानंतर आता पुढं काय, याची काळजी वाटतेय. श्रीनाथ पुढं म्हणाला, मी चटगांवमध्ये (बांग्लादेशमध्ये आयसीसी मॅच रेफरीचं काम करत असतांना) होतो तेव्हा सचिननं फोन करुन आपल्या निवृत्तीबाबत सांगितलं. मी म्हटलं सचिननं चांगला निर्णय घेतलाय. सचिनचा भाऊ अजित तेंडुलकरनं सुद्धा श्रीनाथच्या वक्तव्याशी सहमती दर्शवली.
माझ्या भावाला आपण निवृत्त झालोय हे स्वीकारणं तसं कठीण जाईल, असं अजित तेंडुलकरनं सांगितलं. आपल्या आयुष्यात सर्वात महत्त्वाची असलेली अशी गोष्ट तो सोडतोय.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.