www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
अवघ्या सोळा वर्षांचा असताना सचिन भारताचं प्रतिनिधित्व करणार आणि इतके रेकॉर्ड बनवणार, असा विचारही तेंडुलकर कुटुंबीयांनी कधी केला नव्हता... असा खुलासा केलाय मास्टर ब्लास्टरचे भाऊ अजित तेंडुलकर यांनी.
एका टीव्ही इंटरव्ह्यू दरम्यान अजित यांनी सचिनचा टेस्ट क्रिकेटला रामराम ठोकण्याचा निर्णय योग्य वेळी घेतल्याचं म्हटलंय. अजित म्हणतात, ‘उत्तुंग स्थानावर राहून सचिन क्रिकेटला गुड बाय म्हणतोय. आम्ही तर कधी विचारही केला नव्हता की १६ व्या वर्षी सचिन भारतातर्फे क्रिकेट खेळेन. आम्ही एक एक पाऊल पुढे टाकण्याचा विचार करत होतो. पहिल्यांदा शालेय स्तरावर सुरू करून क्षेत्रीय स्तरावर त्यानंतर अखिल भारतीय स्तरावर त्यानंतर अंडर १५, अंडर १९ आणि मग सीनियर स्तरावर आणि मग पुढे... कधीच विचार केला नव्हता की सचिन या सगळया स्तरांना पाठिमागे टाकून सोळाव्या वर्षीच भारताचं प्रतिनिधित्व करेल’.
‘१९८९ मध्ये पाकिस्तान दौऱ्यासाठी भारतीय टीममध्ये पहिल्यांदा सचिनची निवड झाली आणि आम्हाला खूप आनंद झाला... अभिमान वाटला... त्यावेळी सगळ्याचा कुटुंबाल खूप आनंद झाला होता. टेस्ट क्रिकेटला टाटा करण्याचा सचिनचा निर्णय कुटुंबातील सदस्यांसाठी धक्कादायक नक्कीच नव्हता कारण तो गेल्या काही वेळेपासून सीरीजमध्ये निवृत्तीचं आकलन करत होता’ असंही अजित तेंडुलकर यांनी म्हटलंय.
अजित म्हणतात, ‘मला आठवतंय... २८ फेब्रुवारी १९९५ रोजी आमच्या वडलांना हृदयरोगाचा धक्का बसला होता आणि सचिनला ही गोष्ट माहित होऊ द्यायची नव्हती. कारण, दुसऱ्या दिवशी त्याला बॅटींग करायची होती तो मॅचचा अंतिम दिवस होता. १९९९ च्या विश्वकपमध्ये (जेव्हा सचिनच्या वडिलांचा मृत्यू झाला) असंच घडलं होतं. आम्हाला विश्वचषक खेळण्यासाठी इंग्लंडला परत जाण्यासाठी त्याला सांगावं लागलं नाही. तो आमच्या वडिलांना खूप चांगलं ओळखत होता. आमच्या वडिलांनीही सचिनला सांगितलं असतं, की परत जा आणि खेळ… हे खूप कठिण होतं. पण सर्व भावनांना दूर ठेऊन त्यानं इंग्लंडला परत जाण्याचा आणि विश्वचषकातील सर्व मॅच खेळण्याचा निर्णय घेतला. घरातून मैदानावर परतल्यानंतर पहिल्याच विश्वचषकाच्या सामन्यात केनियाविरुद्ध सचिचननं शतक ठोकलं’.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.