भाजक्या पोह्यांचा चिवडा

साहित्य : पाव किलो भाजके पोहे, सव्वाशे ग्रॅम शेंगदाणे, १ वाटी सुक्या खोब-याचे काप, शंभर ग्रॅम चण्याची डाळ, ९-१० मिरच्यांचे तुकडे, (आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता) किंवा लाल तिखट, १०-१२ लसूण पाकळ्या बारीक करून (चवीप्रमाणे कमी जास्त)

Updated: Oct 22, 2012, 05:26 PM IST

www.24taas.com, मुबंई
साहित्य -
पाव किलो भाजके पोहे, सव्वाशे ग्रॅम शेंगदाणे, १ वाटी सुक्या खोब-याचे काप, शंभर ग्रॅम चण्याची डाळ, ९-१० मिरच्यांचे तुकडे, (आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता) किंवा लाल तिखट,
१०-१२ लसूण पाकळ्या बारीक करून (चवीप्रमाणे कमी जास्त), कढीपत्त्याची पाने भरपूर (किमान वीस-पंचवीस), २ चमचे मोहरी, २ चमचे हिंग, २ चमचे धन्या-जीऱ्याची पूड, २ वाट्या तेल, मीठ चवीप्रमाणे
कृती –
सर्वप्रथम भाजके पोहे नीट चाळून घ्यावेत. त्यानंतर ते उन्हात वाळत ठेवा. एका मोठ्या पातेल्यात फोडणीसाठी तेल घ्या. त्यात अगोदर शेंगदाणे घालून तळून घ्यावेत. त्यात मोहरी, हळद, हिंग, मिरच्या, कढीपत्त्याची पाने, तळलेले शेंगदाणे, चण्याची डाळ,लसूण पाकळ्या घालून परतावे. हे सर्व सामान एकापाठोपाठ घालावे.
हे सर्व सामान घातल्यानंतर त्यात भाजके पोहे घालावेत. त्यानंतर मीठ, साखर घालून नीट ढवळावे. चिवडा एकजीव करावा. नीट परतून घ्यावा. गार झाल्यावर किंवा गरम गरम देखील खायला घ्यावा.