आठवले पलटले : राज ठाकरेंनाच हाणलाय टोला!

शिवसेनेमध्ये पक्षांतर्गत नाराजीनाट्य घडत असलं तरी मित्रपक्ष म्हणून उद्धव ठाकरेंवर विश्वास असल्याचं रिपाइं नेते रामदास आठवले यांनी म्हटलंय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Dec 5, 2013, 12:18 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
शिवसेनेमध्ये पक्षांतर्गत नाराजीनाट्य घडत असलं तरी मित्रपक्ष म्हणून उद्धव ठाकरेंवर विश्वास असल्याचं रिपाइं नेते रामदास आठवले यांनी म्हटलंय. उध्दव चांगल्या पध्दतीने काम करत असून तेच बाळासाहेबांचे वारस असल्याचं त्यांनी म्हटलंय.
उद्धव ठाकरेंना आपला पाठिंबा देत आणि आपल्या वक्तव्याचं स्पष्टीकरण करत ‘उद्धव ठाकरेंच्या भाषणाची स्टाईल बाळासाहेबांसारखी नसली म्हणून काय झालं?... काम करण्याची पद्धत तरी तीच आहे....’ असं आठवलेंनी यावेळी म्हटलं. यावरच आठवले थांबले नाहीत तर ‘ज्यांच्याकडे बाळासाहेबांसारखी भाषणाची स्टाईल आहे त्यांनी स्टाईल मारावी’ असा टोलाही त्यांनी यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना नाव न घेता लगावलाय.
दरम्यान, कार्यकर्त्यांच्या इच्छेखातर राज्यसभेवर जाणार असल्याचं सांगत, आपली इच्छाही त्यांनी स्पष्ट केलीय. राज्यसभेच्या सातपैंकी सहावी सुरक्षित जागा मला मिळायलाच हवी, असंही त्यांनी म्हटलंय.

व्हिडिओ पाहा :-

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.