एक्झिट पोलचा भाजपला कौल, बाजार उसळला, सेन्सेक्स २१ हजारांच्या पुढं!

पाच राज्यांमध्ये मतदान झाल्यानंतर एक्झिट पोलनं वर्तवलेल्या अंदाजातून भाजप पुढं असल्याचं दिसून येतंय. एक्झिट पोलचे अंदाज बाहेर आल्यानंतर आता सेन्सेक्सही वधारलाय. सेन्सेक्स सुरू झाल्यानंतर लगेचच ४३९ अंशांची वाढ होत २१ हजार १४८.२६ वर सेन्सेक्स पोहचला.

Aparna Deshpande Aparna Deshpande | Updated: Dec 5, 2013, 12:10 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
पाच राज्यांमध्ये मतदान झाल्यानंतर एक्झिट पोलनं वर्तवलेल्या अंदाजातून भाजप पुढं असल्याचं दिसून येतंय. एक्झिट पोलचे अंदाज बाहेर आल्यानंतर आता सेन्सेक्सही वधारलाय. सेन्सेक्स सुरू झाल्यानंतर लगेचच ४३९ अंशांची वाढ होत २१ हजार १४८.२६ वर सेन्सेक्स पोहचला.
चार राज्यात काँटे की टक्कर आहे... दिल्लीमध्ये ७० टक्के, मध्यप्रदेशात आणि छत्तीसगढमध्ये ७० टक्के तर राजस्थानमध्ये ७४ टक्के मतदान झालंय... जर भाजप पाच राज्यांपैकी चार राज्य जिंकली तर निफ्टी ६४००नी वाढण्याचा अंदाज तज्ज्ञांनी वर्तवलाय... यापुढच्या काळात लोकसभा निवडणुकीवर परिणाम दिसण्याची शक्यताय...
चार राज्यात बदल होण्याची शक्यता निर्माण झाल्यानं विश्वासाचं वातावरण निर्माण झालंय. याचंच प्रत्यंतर लगेच पहायला मिळालं... सिंगापूरमध्ये निफ्टीनं ६३०० अंशांची सुरुवात केली. याचेच परिणाम सेन्सेक्सवरही पहायला मिळाला. रियल इस्टेट, इन्फ्रास्ट्रक्चर इत्यादी क्षेत्रांमध्ये तेजी पहायला मिळू शकते...
२००९च्या निकालानंतर सेन्सेक्स १८ अंशांनी वधारला होता... तर २००४च्या निवडणुकीनंतर सेन्सेक्स १९ अंशांखाली घसरला होता... गेल्या काही वर्षांत परदेशी गुंतवणूक संस्थांनी भारतातली गुंतवणूक काढून घेतली... आता एक्झिट पोलच्या अंदाजानंतरही सेन्सेक्समध्ये वाढ झालीय.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.