www.24taas.com, कोल्हापूर
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कोल्हापूरच्या जाहीर सभेत पुन्हा एकदा परप्रांतियांना `टार्गेट` केलं. मराठीचा मुद्दा पुन्हा एकदा उचलून धरला. मराठीच्या मुद्द्यावर एकहाती सत्ता आणू, असे ठाम मत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले होते.
राज ठाकरे सध्या राज्याच्या दौऱ्यावर आहेत. आजची पिढी खूप स्मार्ट आहे. "बाप दाखव, नाही तर श्राद्ध घाल,` असे ठणकावणारी आजची पिढी आहे. या तरुणाईच्या पाठबळावरच मी हा दावा करीत आहे. आज सत्तेवर येण्यासाठी युती, आघाड्या दिसतात; पण उद्या हेही चित्र बदलेल. सत्तेसाठी त्याची गरज भासणार नाही, यावर माझा विश्वास आहे.``
तुमच्या मनातील प्रत्येक प्रश्नाचे उत्तर उद्याच्या सभेत मिळेल, असे सांगून खोचक प्रश्नांना त्यांनी बगल दिली व सभेची उत्सुकता अधिक ताणली. तरीही पत्रकारांनी दुष्काळासंदर्भात छेडले असता ठाकरी बाण्यातच त्यांनी पत्रकारांना फटकारले. ते म्हणाले, `पन्नास वर्षांनंतरही राज्यातील दुष्काळ हटत नाही. इतकी वर्षे राज्य केले त्यांना याचा जाब न विचारता मला प्रश्न विचारता.` त्यामुळे पुन्हा एकदा मराठीचा मुद्द्यावर राजकारण सुरू झालं आहे.