www.24taas.com, पुणे
पुणेकरांचा गुन्हेगार संतोष मानेला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. आज पुण्याच्या सत्र न्यायलयाने हा निकाल दिला आहे. संतोष माने हा राज्यासाठी कलंक होता, असे मतही न्यायालयाने व्यक्त केले आहे.
नऊ निष्पाप पुणेकरांचा बळी घेणारा आणि २७ पुणेकरांना जखमी करणारा क्रूरकर्मा संतोष माने हा स्वारगेट डेपोला एसटी ड्रायव्हर ड्युटीवर नसताना डेपोतून एसटी पळवून नेऊन संपूर्ण पुण्यात थैमान घातलं होतं. संतोष मानेवर ३०२ खून करणं, ३०७ खुनाचा प्रयत्न करणं, ३२६ गंभीर दुखापत, ३२४ दुखापत करणं, ३८१ नोकराकडून मालमत्तेची चोरी अशा कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.
संतोष माने हा सामान्य माणसाचा शत्रू असल्याचं सांगत त्याचं वकीलपत्र न स्वीकारण्याचा निर्णय पुणे बार असोसिएशननं घेतला. संतोष मानेनं केलेलं हे कृत्य फक्त पुण्यालाच नाही तर संपूर्ण देशाला हादरवणारं आहे. त्याला कोर्टात हजर केलं त्यावेळी त्याच्या चेहऱ्यावर पश्चातापाचे कुठलेही भाव नव्हते. अशा नराधमाला कठोरात कठोर शिक्षा देण्याची पुणेकरांची मागणी होती.
पुण्यात हैदोस घालणाऱ्या माथेफिरू संतोष हा समाजाला मोठा कलंक आहे. त्याला फाशी देणेय योग्य होतं. त्याला दया दाखविणे समाजविरोधी ठरेल. त्याच्या तांडवाने राज्याला कलंक लागला आहे. खटल्यादरम्यान संतोष मानेने न्यायालयाची दिशाभूल केली करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्याला शिक्षा होणे गरजेचं होतं, असं न्यायालयाने म्हटलं आहे.
सोलापूर जिल्ह्यातल्या कैठाळे गावचा संतोष माने हा रहिवासी आहे. १९७१ चा जन्म असलेल्या मानेचे वय ४२ वर्ष आहे. तो स्वारगेट बस डेपोत २००९ मध्ये भरती झाला. एसटीमध्ये तो कायमस्वरुपी ड्रायव्हर होता. मानेने २४ जानेवारी २०१२ रात्री साडेसात वाजता स्वारगेटला गाणगापूर-पुणे एसटी घेऊन आला होता. त्यावेळी तो पुण्यात एसटीच्या रेस्ट हाऊसमध्ये राहात होता. मानेने २४ जानेवारी २०१२ रोजी सकाळी ड्युटी नसताना आला होता. सातारा-स्वारगेट-सातारा ही बस त्यानं ताब्यात घेतली आणि बेभान होऊन त्यांने एसटी पळविली. यामध्ये काही गाड्या उडवत नऊ जणांचा बळी घेतला.
नेमकं काय घडलं होतं
मुळचा सोलापूरचा असलेला संतोष माने एस टी च्या स्वारगेट डेपोला ड्रायव्हर म्हणून कामाला होता. २५ जानेवारीच्या सकाळी माने लवकरची ड्युटी मागण्यासाठी डेपोमध्ये गेला. त्याला सकाळी १ ० ऐवजी सकाळी ८ ची ड्युटी हवी होती. मात्र ड्रायव्हरच्या उपलब्धतेमुळे त्याला ती मिळू शकली नाही. त्यानंतर मानेनं परत फिरणं अपेक्षित होतं . मात्र तसं झालं नाही.
सातारा डेपोची एक बस (बस क्रमांक - MH - 14 BT 1532) नुकतीच स्वारगेट स्थानकात आलेली होती. बसचा ड्रायव्हर एन्ट्री करण्यासाठी कंट्रोल रूम मध्ये गेलेला होता. तेवढ्यात संतोष मानेनं त्या बसचा ताबा घेतला. त्यानं बस सुरु केली आणि मनाला वाटेल त्या दिशेनं धावत सुटला. स्वारगेट एस टी स्टेन्ड मध्ये एक वळसा घालेस्तोवर ३ -४ जण मानेच्या बसखाली आले होते. इतरांना काही कळायच्या आत मानेची बस हडपसर रस्त्याला लागली. त्यानंतर नो एन्ट्री मधून पुलगेट, क्याम्प, मार्केट यार्ड रोड, मित्रमंडळ चौक, सारसबाग करत बस सिंहगड रस्त्याला लागली होती. तोपर्यंत बसची बातमी शहरभर पसरली होती.
प्रत्येक माणूस आपापल्या परीने सतर्क बनला होता. त्याचवेळी शेकडो लोक आणि अर्थातच पोलिस या पिसाळलेल्या बसचा पाठलाग करत होते. पोलिसांनी बसच्या दिशेने गोळीबारही केला …
एक पोलिस बसवर चढला…. आपल्याच मस्तीत असलेला मने काही केल्या बस थांबवायला तयार नव्हता… अखेर पर्वती पायथ्याजवळ , नीलायम पुलाखाली मानेची बस डिव्हायडरला धडकली. त्याठिकाणी देखील एका कारचा चुराडा करूनच बस आपोआप थांबली… काही तरुणांनी बसवर चढून मानेला ताब्यात घेतलं