www.24taas.com, जळगाव
राज ठाकरे महाराष्ट्राच्या दौ-यावर असताना सरकारवर टीकेचा आसुड ओढताएत तर जळगाव महापालिकेतल्या त्यांच्या पक्षाचे एकमेव नगरसेवक ललित कोल्हे यांना जिल्हा सत्र न्यायालयानं एका खटल्यात वर्षभराच्या सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावलीय. रेमंड कंपनीतील संघटनेच्या गटातटावरून 2003 मध्ये कोर्ट चौकात झालेल्या गोळीबारात धनराज चौधरी यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली होती.
याप्रकरणी शहर पोलीस स्टेशनमध्ये ललित कोल्हेसह चार जणांविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्यासह आर्म्स ऍक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. या खटल्याची सुनावणी कोर्टात सुरू होती. आर्म्स ऍक्टप्रकरणी कोर्टानं ललित कोल्हेंना निर्दोष ठरवलं. तर हल्ल्याप्रकरणी कोर्टानं कोल्हे यांना शिक्षा ठोठावली आहे.
दरम्यान या शिक्षेविरुद्ध कोल्हे यांना वरच्या कोर्टात अपील करण्याची मुभा आहे. येत्या 7 एप्रिल रोजी राज ठाकरे हे जळगावात सभा घेणार आहेत. यावेळी गुन्हेगार नगरसेवकाला राज व्यासपीठावर स्थान देतात का हे पाहणं औत्सुक्याचं ठरणारेय.