www.24taas.com, झी मीडिया, कोल्हापूर
कोल्हापुरात आजपासून टोल वसुली सुरू होतेय. त्या पार्श्वभूमीवर टोल नाक्यावर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलाय. परिसरात कलम १४४लागू करण्यात आलाय.
टोलविरोधी कृती समितीच्यावतीनं कुठल्याही प्रकारचा रास्ता रोको न करता वाहनधारकांना टोल न भरण्याचं आवाहन केलं जातंय. तर कृती समितीचे नेते एन. डी. पाटील यांच्या नेतृत्वाखाली टोल नाक्यांवर कृती समितीचं ठिय्या आंदोलन सुरू झालंय.
दरम्यान, काल कोल्हापूरात आय.आर.बी कंपनीनं केलेल्या रस्त्यांच्या दर्जाबाबत येत्या पंधरा दिवसात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यासोबत बैठक घेतली जाईल, असं अश्वासन गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी टोल विरोधी कृती समितीला दिलंय.
मात्र आजपासून सुरू झालेल्या टोल वसुलीबाबत त्यांनी काहीही बोलायला नकार दिला. टोल विरोधात आज कोल्हापूर जिल्ह्यात कडकडीत बंद पुकारुन काळा दिन पाळण्याचा निर्णय टोल विरोधी कृती समितीनं घेतलाय.
त्याचबरोबर शहरातल्या नऊ नाक्यावर चक्का जाम आंदोलन करण्याचा निर्णय़ घेण्यात आलाय. या आंदोलनाच्या पार्श्वभूमिवर बुधवारी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्या घरावर टोल मोर्चा काढण्यात आला. टोलला विरोध करण्यासाठी येणाऱ्या आंदोलकांवर पोलिसांनी बळाचा वापर करु नये अन्यथा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल असा इशारा देण्यात आलाय.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
पाहा व्हिडिओ