www.24taas.com, अहमदनगर
दुष्काळग्रस्तांच्या मदतीला समाजाच्या सर्व थरातून मदत उभी केली जात आहे. दुष्काळात होरपळत असलेल्या महाराष्ट्राचं चित्र पाहून पूर्वी देहविक्री करणा-या महिला दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी पुढे आल्या आहेत.
देहविक्री करणाऱ्या महिलांनी आपली एक दिवसाची 15 हजार 213 एवढी कमाई दुष्काळ निधीसाठी देऊन समाजासमोर वेगळा आदर्श निर्माण केला आहे. तसंच एक दिवसाचा उपवास करून या महिलांनी राज्यावरील दुष्काळाचं सावट दूर व्हावं यासाठी देवाकडे प्रार्थनाही केलीय.
याशिवाय या महिलांनी महिनाभरात एक लाखांचा निधी गोळा करण्याचा संकल्पही केलाय. या महिलांना यापूर्वीही अनेक आपत्तींमध्ये निधी देऊन समाजासमोर चांगला आदर्श निर्माण केलाय.