राज ठाकरेंच्या पुण्यातील सभेला मिळाली जागा

पुण्यातील मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभेला अखेर जागा मिळाली आहे. मुठा नदीच्या पात्रात राज ठाकरे यांची सभा होणार आहे. एसपी कॉलेजनं मैदान देण्यास नकार दिल्यानंतर मनसेनं मुठा नदीच्या पात्रात सभा घेण्याचा निर्णय घेतलाय.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Feb 7, 2014, 06:40 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, पुणे
पुण्यातील मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभेला अखेर जागा मिळाली आहे. मुठा नदीच्या पात्रात राज ठाकरे यांची सभा होणार आहे. एसपी कॉलेजनं मैदान देण्यास नकार दिल्यानंतर मनसेनं मुठा नदीच्या पात्रात सभा घेण्याचा निर्णय घेतलाय.
राज ठाकरेंच्या पुण्यातील सभेला अजूनही पाहिजे ते ठिकाण मिळालेलं नही, त्यामुळे सभा होणार की नाही याबाबत भ्रम होता. अशा परिस्थितीत ही सभा एस पी कॉलेजच्याच मैदानावर घेण्याचा आग्रह मनसेनं धरला होता. एस पी च्या व्यवस्थापनाने मात्र राजकीय सभेसाठी मैदान उपलब्ध करून देण्याला आधीच नकार दिला होता. त्यामुळे या जागेचा प्रश्न निकाली निघाला.
दरम्यान, ९ तारखेच्या सभेसाठी राज ठाकरे २ दिवस आधीपासूनच म्हणजे आजच पुण्याकडे रवाना झाले आहेत. त्यामुळे या विषयात ते काय भूमिका घेतात याकडे आता लक्ष लागले होते. राजकीय पक्षांनी सभा घ्यायच्या तरी कुठे असा संतप्त सवाल करत कार्यकर्ते मात्र एस पी वरच सभा घेण्यावर ठाम होते. मात्र पुण्यातील मैदानं का नकोत ? एसपी कॉलेजचाच आग्रह कशासाठी ? असे प्रश्न यानिमित्तानं उपस्थित कऱण्यात आले आहेत.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.