परदेशात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांची फसवणूक

विमानांची तिकीट बुकिंग करणाऱ्या कंपनीकडून परदेशात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांची फसवणूक झाल्याचं प्रकरण पुण्यात उघड झालंय. चंडिगढमधल्या इंडो-कॅनेडीयन कंपनीन अशा हजारो पालकांना कोट्यवधींचा गंडा घातलाय.

Updated: Nov 7, 2012, 08:12 PM IST

www.24taas.com, पुणे
विमानांची तिकीट बुकिंग करणाऱ्या कंपनीकडून परदेशात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांची फसवणूक झाल्याचं प्रकरण पुण्यात उघड झालंय. चंडिगढमधल्या इंडो-कॅनेडीयन कंपनीन अशा हजारो पालकांना कोट्यवधींचा गंडा घातलाय. विदेशात शिकणा-या मुलांना डिसेंबरमध्ये परीक्षा संपल्यानंतर सुट्या लागतात.
त्यामुळं भारतात घरी परतण्यासाठी तसंच पुन्हा परत परदेशात जाण्यासाठी शेकडो मुलांच्या पालकांनी इंडो-कॅनेडीयन कंपनीच्या मार्फत विमानाची तिकिटे बुक केली. अर्ध्या तासात तिकीट देतो असं सांगणा-या कंपनीकडून त्यांना अजूनही तिकिटे मिळाली नाहीत.
त्यांना तिकीट देऊ शकत नसल्याचं कंपनीचे कर्मचारी सांगत आहेत. याप्रकरणी संबधित बुकिंग कंपनीवर कारवाई होण्याबरोबरच संबधित विमान कंपनी तसंच बँकेचीही चौकशी व्हावी अशी मागणी क्रिएटिव फाउंडेशन या सामाजिक संस्थेनं केलीय. दरम्यान या प्रकरणी पुणे पोलीस आयुक्तांकडे तक्रार देण्यात आलीय.