‘त्या’नं पेटत्या चितेत मारली उडी, भाजून मृत्यू

पूर्वीच्या काळी नवऱ्याचा मृत्यू झाल्यानंतर त्याची पत्नी त्याच्या पार्थिवासोबतच सती जायची, ही बाब आपल्या सगळ्यांनाच माहितीय. मात्र आज २१व्या शतकात पुण्यात एक खळबळजनक घटना घडलीय. एका अज्ञात व्यक्तीनं चक्क पेटत्या चितेत उडी मारलीय.

Aparna Deshpande Aparna Deshpande | Updated: Dec 4, 2013, 03:57 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, पुणे
पूर्वीच्या काळी नवऱ्याचा मृत्यू झाल्यानंतर त्याची पत्नी त्याच्या पार्थिवासोबतच सती जायची, ही बाब आपल्या सगळ्यांनाच माहितीय. मात्र आज २१व्या शतकात पुण्यात एक खळबळजनक घटना घडलीय. एका अज्ञात व्यक्तीनं चक्क पेटत्या चितेत उडी मारलीय.
पुण्यातल्या धनकवडी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार सुरू होते. एक प्रेत जळत होतं. अचानक एक अज्ञात व्यक्ती पळत आला आणि त्यानं पेटत्या चितेत स्वत:ला झोकून दिलं. स्मशानभूमीत तिथं हजर असलेल्या कोणत्याही व्यक्तीला काही कळायच्या आतच हा सर्व प्रकार घडला.
आरडाओरडा झाला मात्र ती व्यक्ती काही प्रेतावरुन बाहेर पडली नाही. शेवटी अग्नीशमन दलाला पाचारण करण्यात आलं. पण अग्नीशमन दलाचे जवान आले त्यांनी त्या व्यक्तीला बाहेर काढलं. पण तो वाचू शकला नाही. पूर्णपणे भाजल्यानं त्या व्यक्तीचा मृत्यू झाला. आता पोलीस ही अज्ञात व्यक्ती कोण? याचा शोध घेत आहेत. नेमकं ‘त्या’ व्यक्तीनं असं का केलं? याबाबत सर्वच लोकं संभ्रमात आहेत.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.