पुण्यात नवऱ्याने बायकोला पेटवून दिले

बायकोशी झालेल्या वादातून तिला पेटवून देत जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना पुण्यातल्या मंडई भागात घडलीये… या महिलेचा पती आरोपी शंकर जोगदंड याला विश्रामबाग पोलिसांनी अटक केलीय.

Updated: Dec 19, 2013, 08:51 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, पुणे
बायकोशी झालेल्या वादातून तिला पेटवून देत जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना पुण्यातल्या मंडई भागात घडलीये… या महिलेचा पती आरोपी शंकर जोगदंड याला विश्रामबाग पोलिसांनी अटक केलीय.
आरोपी शंकर जोगदंड याचे अनैतिक संबंध असल्याचा संशय त्याच्या पत्नीला होता. आपली पत्नी आपल्यावर संशय घेते हा राग डोक्यात घेउन शंकरनं रात्री पेट्रोल ओतून पत्नीला पेटवून दिलं. यामध्ये राधा जोगदंड ६० टक्के भाजलीय.
असून तिची परिस्थिती नाजूक आहे… आरोपी शंकर जोगदंड याला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून अधिक तपास पोलिस करतायेत…

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.