www.24taas.com, झी मीडिया, पुणे
१२ जानेवारीला स्वामी विवेकानंदांची १५१ वी जयंती साजरी केली जातेय. आणि याच दिवशी स्वामी विवेकानंदांना अभिवादन करण्यासाठी पुण्यातल्या एसएनडीटीच्या विद्यार्थिनी पुणे ते कन्याकुमारी हा तब्बल १८०० किलोमीटरचा प्रवास सायकल वरून करणार आहेत. या मुलींची ही प्रॅक्टिस पाहून एखाद्या सायतलिंग स्पर्धेची तयारी सुरू आहे, असंच वाटेल. मात्र ही तयारी कुठल्याही स्पर्धेची नाही.
त्यासाठी गेल्या चार महिन्यांपासून त्यांची प्रॅक्टिस सुरू आहे. पुण्यातल्या एसएनडीटीच्या कॅम्पसमधून २२ तारखेला ही रॅली सुरु होणार आहे. त्यानंतर २० दिवसांचा प्रवास करून १० जानेवारीला या विद्यार्थिनी कन्याकुमारीला पोहोचतील. या प्रवासादरम्यान विविध गावांमध्ये त्या विवेकानंदांच्या विचारांचा प्रसारही करणार आहेत.
स्वामी विवेकानंद हे तरुणांसाठी एक आदर्श आहेत...त्यांचे विचार आणि त्यांनी केलेलं कार्य हे तरुणांना प्रेरणा देणारं ठरलंय. त्यांच्या याच कार्याला अभिवादन करण्यासाठी या विद्यार्थिनींचा हा उपक्रम नक्कीच कौतुकास्पद आहे ....
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.