www.24taas.com, झी मीडिया, सांगली
जिवंत नागांच्या पुजेसाठी जगप्रसिद्ध असलेल्या सांगली जिल्ह्यातील बत्तीस शिराळा या गावात नागपंचमीचा उत्सव पहाण्यासाठी हजारो नगरीक दाखल झाले आहेत. बत्तीस शिराळा येथील नागपंचमीला शेकडो वर्षाची परंपरा आहे.
या दिवशी या गावात चक्क जिवंत नागांची पूजा करण्यात येते. 2002 सालापासून प्राणीमित्र आणि सर्प प्रेमींच्या विरोधामुळे येथील उत्सवावर कोर्टानं काही प्रमाणावर मर्यादा आणल्या आहेत. त्यामुळे सापांची मिरवणूक आणि उंच नागांच्या स्पर्धा न भरवता आता फक्त पारंपरिक पद्धतीने घरोघरी नागपूजा केली जाते. नागपंचमीच्या आधी आठवडाभर नाग पकडून आणले जातात. नाग हे डेऱ्यामध्ये ठेवले जातात. दररोज सकाळ - संध्याकाळ या नागांना बाहेर काढून त्यांची देखभाल केली जाते.
नागपंचमीच्या दिवशी सकाळी घरात नागाची पूजा केली जाते. गावातील अंबामाता देवीला नैवद्य दाखवून नागांना दर्शनासाठी मंदिरा समोर आणले जाते. मानकरी `महाजन` यांच्या वाड्या तून पालखी काढली जाते. आणि त्यानंतर नागांना पुन्हा आणलेल्या ठिकाणी सोडलं जातं. नागपंचमीचा हा आगळावेगळा सोहळा पहाण्यासाठी दरवर्षी भाविक गर्दी करतात
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.