www.24taas.com , झी मीडिया, सांगली
महावितरण आणि महाजनकोने ६० हजार कोटींचा घोटाळा असून, या घोटाळ्याला उर्जामंत्री अजित पवार यांचं संरक्षण आहे, असा गंभीर आरोप भाजपचे प्रवक्ते माधव भंडारी यांनी केला. सांगलीत भंडारी हे प्रसारमाध्यामांशी बोलत होते.
अस्तित्वात नसलेल्या ग्राहकांच्या नावावर बिलं काढून महावितरण, सरकार आणि जनतेची फसवणूक करीत असल्याचा आरोप भंडारींनी केलाय. या घोटाळ्याची माहिती अद्याप मुख्यमंत्र्यांना नव्हती. आम्ही जेव्हा ही धक्कादायक माहिती दिली तेव्हा मुख्यमंत्र्यांनी आश्चर्य व्यक्त केल्याचंही भंडारी म्हणालेत.
मुख्यमंत्र्यांनी काल भाजप नेते एकनाथ खडसे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली होती. तेव्हा उर्जाखात्यातल्या भ्रष्टाचाराचे कागदोपत्री पुरावे भाजपच्या शिष्टमंडळाकडून मुख्यमंत्र्यांच्या हाती सोपवण्यात आले होते. आता मुख्यमंत्री काय पाऊल उचलतात याकडे सगळ्यांचं लक्ष आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.