www.24taas.com, झी मीडिया, पुणे
पुणेकरांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी... पुणेकरांना गुरुवारपासून दिवसातून फक्त एक वेळ पाणी मिळणार आहे. महत्त्वाचं म्हणजे पुण्याची धरणं शंभर टक्के भरली आहेत. दुसरीकडे अजूनही पुण्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. तरीही पुणेकरांना एकच वेळ पाणी मिळणार आहे. महापालिकेनं हा निर्णय घेतलाय.
यंदा पाऊस उत्तम झालाय. पावसाळा संपला तरी पाऊस अजूमही राज्यातून मुक्काम आटोपता घेत नाहीय. पुण्यातही यंदा भरपूर पाऊस झाला. आजही पुण्यातल्या सर्वच भागत पावसानं हजेरी लावली. आज सकाळपासूनच कडक उन्हामुळे वातावरणामध्ये प्रचंड उकाडा जाणवत होता. दुपारी चार वाजल्याच्या सुमारास अचानक मुसळधार पावसाळा सुरुवात झाली. तब्बल एक तास मुसळधार पाऊस कोसळत होता... तर दुसरीकडे पुण्याला पाणीपुरवठा करणारी खडकवासला, वरसगाव, पानशेत ही सगळी धरणं शंभर टक्के भरलीयत. त्यामुळे यंदा तरी पाण्याची चिंता नाही, असा पुणेकरांना विश्वास होता.
पण, महापालिकेनं पुणेकरांचा विश्वासघात केलाय. पाण्याची कृपा होऊनही पुणेकरांना आता पुन्हा पाणीकपातीला सामोरं जावं लागणार आहे. जलसंपदा विभागानं पुण्याला ज्यादा पाणी देणं बंद केलं त्यामुळे पाणी कपातीचा निर्णय कालवा समितीनं घेतल्याचं सांगण्यात येतंय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.