www.24taas.com, पुणे
पालघर फेसबूक प्रकरणात करण्यात आलेलं दोन पोलीस अधिकाऱ्यांचं निलंबन योग्यच असल्याचं मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलंय.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्यूनंतर दुसऱ्या दिवशी फेसबूकवर वादग्रस्त विधान करणाऱ्या दोन मुलींना अटक केल्यावरून गैरजबाबदार वर्तवणुकीचा ठपका ठेऊन राज्यसरकारनं ठाण्याचे (ग्रामीण) पोलीस अधीक्षक रविंद्र सेनगांवकर आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीकांत पिंगळे यांचं निलंबन केलंय. या प्रकरणात झालेली पोलीस अधिकाऱ्यांविरोधात झालेली कारवाई योग्यच होती, असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय.
एका कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्र्यांनी, आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशांचं उल्लंघन करणाऱ्या दोन या पोलिस अधिकाऱ्यांवर निलंबनाच्या कारवाईची अंमलबजावणी करण्यात आल्याची माहिती दिलीय.