पुण्यात कर्जबाजारीपणातून आई, पत्नीसह मुलीची हत्या

कर्जबाजारीपणातून तिघांची हत्या करण्यात आल्याची घटना पुण्यात घडली आहे. हडपसरमध्ये ‘एसएलके हाईट्स’ या इमारतीत राहणार्यात सागर गायकवाडनं आपली आई शकुंतला गायकवाड, पत्नी कविता गायकवाड आणि ७ वर्षांची मुलगी इशिता गायकवाड हिचा ओढणीनं गळा आवळून खून केलाय.

Aparna Deshpande Aparna Deshpande | Updated: Apr 9, 2014, 04:21 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, पुणे
कर्जबाजारीपणातून तिघांची हत्या करण्यात आल्याची घटना पुण्यात घडली आहे. हडपसरमध्ये ‘एसएलके हाईट्स’ या इमारतीत राहणार्यात सागर गायकवाडनं आपली आई शकुंतला गायकवाड, पत्नी कविता गायकवाड आणि ७ वर्षांची मुलगी इशिता गायकवाड हिचा ओढणीनं गळा आवळून खून केलाय.
आई, पत्नी आणि मुलीला मारल्यानंतर आरोपी सागरनं स्वत:ला गळफास लावून आत्माहत्येचा प्रयत्न केला. मात्र, फास बसू न शकल्यानं तो वाचला. मंगळवारी दुपारी ही घटना घडली. तेव्हापासून आरोपी सागर घरातच होता. सकाळी तो स्वत:हून पोलिसात हजर झाल्यानं हा प्रकार उघडकीस आला.
सागर याची दोन वर्षांपूर्वी नोकरी गेली होती. त्यानंतर तो आर्थिक अडचणीत सापडला. त्याच्या डोक्यावरील कर्ज वाढल्यानं त्या निराशेतूनच त्यानं हे कृत्य केल्याची प्राथमिक माहिती आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.