www.24taas.com , झी मीडिया, न्यूयॉर्क
सानिया मिर्झा आणि चीनच्या झेंग जीनं अमेरिकन ओपनच्या चवथ्या राऊंडमध्ये दिमाखात प्रवेश केला. 10व्या सीडेड सानिया-झेंग जोडीनं जर्मनीच्या ऍना लेना ग्रोएनेफेल्ड आणि चेक रिपब्लिकच्या क्वेटा पेश्के जोडीचा 6-2, 6-3 अशा सरळ दोन सेट्समध्ये धुव्वा उडवला.
अमेरिकन ओपनच्या वुमेन्स डबल्सच्या पुढच्या राऊंडमध्ये धडक मारण्यासाठी पेस-झेंग जोडीला फारसे कष्ट पडले नाहीत. बोपन्ना, भूपती आणि सोमदेवचं आव्हान संपुष्टात आल्यानंतर आता सानिया मिर्झाकडून भारतीय टेनिसप्रेमींना मोठ्या अपेक्षा असणार आहेत.
तर दुसरीकडे भारताच्या लिएँडर पेसनं अमेरिकन ओपनच्या मेन्स डबल्सच्या मॅचमध्ये चवथ्या राऊंडमध्ये धडक मारलीय.पेसनं आपला चेक रिपब्लिकचा साथीदार लाडेक स्टेपानेकसह खेळतांना फ्रान्सच्या मायकल लॉड्रा आणि निकोलस माहूतवर मात केली. पेस-स्टेपनेकनं लॉड्रा-माहूत जोडीवर 7-5, 4-6, 6-3 नं मात केली.
अतिशय चुरशीच्या या लढतीमध्ये चवथं सीडींग मिळालेल्या पेस आणि स्टेपनेकनं 14व्या सीडेड लॉड्रा आणि माहूत जोडीला पराभवाची चव चाखायला लावली.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.