बॉक्सर विजेंदरची होणार डोप टेस्ट

ऑलिम्पिक ब्राँझ मेडलिस्ट विजेंदर सिंगची डोप टेस्ट होणार आहे. क्रीडा मंत्रालयानं नाडा अर्थातच नॅशनल ऍन्टी डोपिंग एजन्सिला विजेंदरची डोप टेस्ट घेण्य़ाचे आदेश दिलेत.

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Apr 1, 2013, 06:40 PM IST

www.24taas.com, नवी दिल्ली
ऑलिम्पिक ब्राँझ मेडलिस्ट विजेंदर सिंगची डोप टेस्ट होणार आहे. क्रीडा मंत्रालयानं नाडा अर्थातच नॅशनल ऍन्टी डोपिंग एजन्सिला विजेंदरची डोप टेस्ट घेण्य़ाचे आदेश दिलेत.
विजेंदरनं ड्रग्ज घेतल्याचा पंजाब पोलिसांनी दावा केला होता. यानंतर विजेंदरच्या अडचणीत वाढ झाली होती. आणि आता विजेंदरला डोप टेस्टला सामोर जाव लागणार आहे.
ऑलिम्पिक मेडलिस्ट बॉक्सर विजेंदरनं तब्बल 12 वेळा हेरॉईनचं सेवन केल्याचा गौप्यस्फोट पंजाब पोलिसांनी केलाय... त्यामुळे कोट्यवधी रूपयांच्या हेरॉईनप्रकरणात विजेंदर सिंगच्या अडचणी आणखीन वाढल्या आहेत...

हेरॉईन प्रकरणातील मुख्य आरोपी असलेला ड्रग डिलर अनुप सिंग कहलोनशी विजेंदर कायम संपर्कात असल्याचा दावा पंजाब पोलिसांनी केलाय.... या दोघांमध्ये गेल्या वर्षीच्या ऑगस्ट महिन्यापासून 80 वेळा फोनवर संभाषण झालं असून... एसएमएसच्या माध्यमातूनही ते एकमेकांच्या संपर्कात असल्याची माहिती पोलिसांनी दिली...
विजेंदर आणि राम सिंगने केहलोनकडून डिसेंबर 2012 ते फेब्रुवारी 2013दरम्यान हेरॉईन घेतलं असून... जानेवारीत एकदा तर फेब्रुवारीत दोनदा हेरॉईन घेण्याकरता विजेंदर आणि रामसिंग झिराकपूरला गेल्याची माहिती पोलिस तपासात स्पष्ट झाली... सध्यातरी विजेंदरला अटक करणार नसल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलं आहे...