www.24taas.com, नवी दिल्ली
टीम इंडियाचा कॅप्टन महेंद्रसिंग धोनीचं क्रिकेटव्यतिरिक्त ‘बाईक्स’चं प्रेम सगळ्यांनाच माहित आहे. त्याचं हेच वेड त्याला घेऊन चाललंय मोटर रेसिंगच्या जगात! 2013मध्ये होणाऱ्या ‘सुपर बाइक चॅम्पियनशीप’च्या निमित्तानं धोनी एका नव्या इनिंगला प्रारंभ करतोय.
मागच्याच महिन्यात स्वतंत्र चेक राज्यात अमित सांडिल यांनं रेस डेमध्ये सहभाग नोंदवला. यानंतर कवासकी एमएसडी आर-एन टीम इंडियानं सुपरस्पोर्टस चॅम्पियनशिपमध्ये प्रवेश केलाय. ‘आम्हाला दिर्घकाळासाठी हे चित्र पाहायला मिळायला हवं, अशी आशा यावेळी सांडिल यानं व्यक्त केलीय. ‘आशिया खंडात खेळ हे अजूनही प्राथमिक अवस्थेत आहे. या माध्यमातून आमचाही खेळांना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्याचंचं हे पहिलं पाऊल... या चॅम्पियनशीपला सफलतेसाठी आम्ही पूर्ण प्रयत्न करतोय. त्यामाध्यमातून भारत आणि आशियातील इतर देशांतील लोकांची खेळांप्रती असलेली रुची सर्वांसमोर येऊ शकेल. आम्हीही रेसिंग अकॅडमी सुरू करण्याच्या प्रयत्नात आहोत’ असं यावेळी सांडिल यानं म्हटलंय.
महेंद्रसिंग धोनी आणि तेलगु अभिनेता नागार्जून हे टीमचे सदस्य तर झालेच आहेत त्याशिवाय त्यांनी मॅनेजमेंट टीममध्येही सहभाग घेतलाय. भारतात पहिल्यांदाच पुढच्या वर्षी मार्च महिन्यात होणाऱ्या बुद्धा आंतरराष्ट्रीय सर्किटमध्ये जागतिक सुपरबाईक चॅम्पियनशीपचं आयोजन केलं जातंय.