www.24taas.com , झी मीडिया, मॉस्को
जमैकाचा स्टार उसेन बोल्टनं वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये तिसऱ्या गोल्ड मेडलला गवसणी घालत, गोल्ड मेडलची हॅट्रीक केलीय. 4 बाय 100 मीटर रिले शर्यतीत जमैकाच्या टीमनं गोल्ड मेडल पटकावलं असून रिले टीममध्ये बोल्टचा समावेश होता. या गोल्डमेडलनं बोल्टनं वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये तीन मेडल मिळवत हॅट्रीक केली.
बोल्टनं याआधी 100 आणि 200 मीटरमध्ये गोल्ड मेडल पटकावलं असून वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये सर्वाधिक 10 मेडल्स मिळवणाऱ्या कार्ल लुईसच्या रेकॉर्डची बोल्टनं आता बरोबरी साधलीय.
आंतरराष्ट्रीय स्पर्धेत बोल्टचं हे आठवं गोल्ड मेडल आहे. त्यानं बर्लिनला २००९मध्ये १०० आणि २०० मीटर स्पर्धेत, २०११ला दीगू इथं २०० मीटर आणि मागील आठवड्यात मॉस्को इथं १०० मीटर आणि २०० मीटरमध्ये गोल्ड मेडल आपल्या नावावर केलेत. याव्यतिरिक्त २००९ आणि २०११मध्ये बोल्ट जमैकाच्या चार वेळा १०० मीटर रिले टीमचा पण तो भाग होता. या टीमनंही गोल्ड मेडल जिंकलं होतं.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.