वीज वितरण कंपनीचा ग्राहकांना शॉक

वीज वितरण कंपनीच्या माध्यामातून भरमसाठ वीज बिलांची आकारणी केली जात असून गळतीच प्रमाण कमी दाखविण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप उद्योजक संघटना करत आहेत.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Oct 15, 2013, 08:03 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, नाशिक
वीज वितरण कंपनीच्या माध्यामातून भरमसाठ वीज बिलांची आकारणी केली जात असून गळतीच प्रमाण कमी दाखविण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप उद्योजक संघटना करत आहेत. विजेचा वापर कमी असताना प्रत्यक्षात जादा बिलाची वसुली केली जात असल्याचा दावा संघटना करतायेत. त्यातच राज्यात नुकतीच लागू करण्यात आलेली वीज दरवाढ अन्यायकारक असून याविरोधात रस्त्यावर उतरण्याचा इशारा संघटनानी दिलाय.
राज्यातील जनतेला पुन्हा एकदा महावितरणने वीज दरवाढीचा शॉक दिलाय. ४६ महिन्यात म्हणजेच साधारणतः साडेतीन वर्षात तब्बल बारावेळा वीज दरवाढ करण्यात आलीय. आता पुन्हा हा झटका ग्राहकांना सहन करावा लागतोय. हा झटका कमी होता की काय म्हणून, वीज ग्राहक संघटना, लघु उद्योग भरती यासह काही संघटनानी वीज गळतीच्या माध्यामतून १३ वर्षात तब्बल ६० हजार कोटी रुपयांची वीज ग्राहक आणि राज्य सरकारची लूट झाल्याचा दावा केलाय. माहितीच्या अधिकारात ही माहिती उघड झाल्याचं संघटना संगतायेत, राज्यातील शेतकऱ्यांचा विजेचा वापर कमी असताना प्रत्यक्षात दुप्पट, तिप्पट वापर दाखवून गळती लपवून चोऱ्या आणि भ्रष्टाचाराला खतपाणी घातलं जात असल्याचा आरोप केला जातोय.
रीडिंग न घेता सरसकट बिल आकारणी केली जात असल्यानं शेतकऱ्यांच कंबरडं मोडण्याची वेळ आली आहे. त्याकरिता त्रयस्थ यंत्रणेच्या माध्यमातून राज्यभरातील शेतकऱ्यांच्या शेती पंपांची पटपडताळणी आणि ऊर्जा वापराचं लेखापरीक्षण करण्याची मागणी केली आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.