www.24taas.com, झी मीडिया, चंद्रपूर
चंद्रपूरची ओळख असलेल्या ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाची सफारी खिसा रिकामी करणारी ठरणार आहे. येत्या १६ ऑक्टोबरला व्याघ्र प्रकल्प ३ महिन्यांच्या सुटीनंतर पुन्हा सुरु होतोय.. नव्या हंगामात वन्यजीवांच्या दर्शनापेक्षा खिशाच्या कात्रीचीच अधिक चर्चा होण्याची चिन्हं आहेत.
वाहन शुल्क - ७५० रुपये (प्रती प्रर्यटक)
गाईड प्रवेश - ३०० रुपये
कॅमेरा शुल्क - ५०० रुपये
हत्ती भ्रमंती - २०० रुपये (प्रती प्रर्यटक )
ताडोबा सफरीचा हा मूलभूत खर्च... तसंच स्वतःचं वाहन ताडोबात न्यायचं असल्यास एक हजार रुपये जादा मोजण्याची तयारीही तु्म्ही ठेवा. कारण यंदाच्या हंगामात १६ ऑक्टोबरपासून ताडोबा खुलं होताच पर्यटकांना या शुल्कवाढीचा फटका बसणार आहे. पट्टेदार वाघांना त्यांच्या हक्काच्या घरात पाहणं आता आणखी खर्चिक होणार आहे. यंदा ऑनलाईन बुकिंग सुरु झाली असून अडीच महिन्यांचं बुकिंग पूर्ण झालंय..
पर्यटकांवर शुल्क वाढीचा मारा होत असताना या प्रकल्पात खाजगी वाहने टप्प्याटप्प्याने बंद करण्याचा निर्णय व्यवस्थापनाने घेतलाय.. याचा एक भाग म्हणून ताडोबातील सर्व जिप्सी वाहने ताडोबा फाउंडेशनकडं नोंदणीकृत लागणार आहे. यासाठी जिप्सी चालकांना मोठी अनामत रक्कमही भरावी लागणार आहे. तर खाजगी वाहनांवर १ हजार रू. अतिरिक्त शुल्क लावलं जाणार आहे.
या शुल्कवाढीमुळं पर्यटकांची ताडोबा सफर होण्यापेक्षा ते सफर होण्याची चिन्हं जास्त आहेत...
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.