धनदांडग्यांच्या वाहनांना पार्किंगसाठी अभय!

रस्त्यवर उभी राहणारी वाहनं पोलीस तत्परतेनं उचलतात. मात्र कारवाई करताना दुजाभाव केला जातो आणि धनदांडगे आणि नेत्यांच्या वाहनांना अभय दिलं जातं, असा नाशिककरांचा आरोप आहे.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Jul 25, 2013, 11:21 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, नाशिक
नाशिक शहरातल्या पार्किंगचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलाय. रस्त्यवर उभी राहणारी वाहनं पोलीस तत्परतेनं उचलतात. मात्र कारवाई करताना दुजाभाव केला जातो आणि धनदांडगे आणि नेत्यांच्या वाहनांना अभय दिलं जातं, असा नाशिककरांचा आरोप आहे.
नो पार्किंगमध्ये उभी असलेली एका नेत्याची गाडी टो करुन नेल्यानंतरचा हा नाशिककरांचा जल्लोष...... कारण जनतेच्या दबावापुढे झुकून पोलिसांना ही कारवाई करावी लागली. मात्र असे प्रसंग रोज घडत नाहीत हेचं दुर्दैव. रस्त्यांवर वाहनं उभी केली की पोलीस तातडीनं उचलून नेतात. आणि दंडात्मक कारवाई केली जाते. मात्र संध्याकाळनंतर मोठ्या हॉटेलबाहेर वाहनाच्या रांगा लावल्या जातात, त्या ठिकाणी कारवाई होत नाही.
पोलिसांनी मात्र नागरिकांचे आरोप फेटाळून लावलेत. मात्र गेल्या वर्षात किती नेत्यांच्या किंवा धनदांड्ग्यांच्या वाहनांवर कारवाई केली, याचं उत्तर मात्र पोलीस देत नाहीत. नाशिक शहरात महापालिका आणि वाहतूक पोलिसांच्या माध्यमातून कारवाई केली जाते. मात्र शहरात पार्किंगसाठी पुरेशी जागाच नसल्यानं वाहनं उभी करयाची कुठे, असा प्रश्न नाशिककरांना पडतो. त्यातच गेल्या सहा वर्षांपासून मल्टी पार्किंगचा विषय चर्चेत. आहे मात्र तो कधी पूर्ण होणार ते माहीत नाही.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.