www.24taas.com, झी मीडिया, नाशिक
यूपीए २ सरकारच्या काळात भ्रष्टाचाराची काळीकुट्ट राजवट बघायला मिळतेय. पंतप्रधान मनमोहनसिंगही आता संशयाच्या भोवऱ्यात आहेत. कोळसा घोटाळ्यावरून काँग्रेसने देशाचे करोडो रुपये लुटलेत. ज्या प्रमाणे बिर्ला आणि पारीख यांना दोषी ठरविलं जात त्या प्रमाणेच मनमोहन सिंग यांच्यावरही सीबीआयने खटला भरून त्यांना अटक केली पाहिजे अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे खासदार गोपीनाथ मुंडे यांनी केली. भारतीय जनता पक्ष युवा मोर्चाच्या प्रशिक्षण शिबिराच्या समारोपाप्रसंगी मुंडे बोलत होते.
आगामी काळात ५ राज्याच्या विधानसभा निवडणुका येतायेत त्यातील मणिपूर व्यतिरिक्त चारही राज्यात भाजप सरकार स्थापन करणार असा आशावाद व्यक्त करतानाच राहुल गांधी यांच्यावर तोंडसुख घेतले. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्भूमीवर काँग्रेस आपला उमेदवार जाहीर करत नाहीये. राहुल गांधी यांचा पूर्व इतिहास चांगला नाही. ज्या ठिकाणी काँग्रेसने राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली निवडणुका लढविल्या त्याठिकाणी काँग्रेसला मार खावा लागलाय. लोकसभा निवडणुकीतही राहुलने नेतृत्व केलं तर काँग्रेस सपाटून मार खाईल अशी टीका मुंडे यांनी केली. निवडणुकीत सोडलं तर उर्वरित दोन राज्यात भ्रष्टाचारी सरकार आहे.
राज्य सरकारच्या कारभारावर टीका करतानाच गृह खात्याचाही मुंडेनी समाचार घेतला. आबा आणि बाबा यांचे पोलीस गुंडांच्या हात हात घालून फिरतात. माझ्या काळात पोलिसांना पोट कमी करण्याचे आदेश देण्यात आले होते.
तसेचं बारामती मध्ये दोन चोर आहेत त्यांना पकडण्यासाठी कुठला अधिकारी नाही तर मीच लागणार असा टोलाही पवार काका पुतण्याच नाव न घेता मुंडेनी लगावला. शरद पवार या वयात गुढघ्याला बाशिंग बांधून बसलेत त्यांची परिस्थिती गावच्या सरपंचासारखी झालीय. कुणाला आठ दहा खासदारांची गरज पडणार त्यांच्यावर पवार लक्ष ठेवून असल्याचा टोला मुंडेनी लगावला. एकूणच एमसीए निवडणूक नात्यानातर पाहिल्याचा जाहीर सभेत गोपीनाथ मुंडेनी चौफेर टोलेबाजी करत काँग्रेस राष्ट्रवादीचा कहार्पूस समाचार घेतला.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.