जादुटोणाविरोधी विधेयकाला मनसेचा पाठिंबा

जादुटोणाविरोधी विधेयकाला मनसेचा पाठिंबा आहेच, मात्र उपवास करणे, वास्तुशांती करण्यासारखे काही मुद्द्यांबाबत आम्हाला संभ्रम आहे. त्यामुळे तो दूर होईपर्यंत आम्हाला विरोध करावाच लागेल, असे मनसेचे विधानसभेतील गटनेते आमदार बाळा नांदगावकर यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत सांगितले.

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Dec 6, 2013, 05:20 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, नागपूर
जादुटोणाविरोधी विधेयकाला मनसेचा पाठिंबा आहेच, मात्र उपवास करणे, वास्तुशांती करण्यासारखे काही मुद्द्यांबाबत आम्हाला संभ्रम आहे. त्यामुळे तो दूर होईपर्यंत आम्हाला विरोध करावाच लागेल, असे मनसेचे विधानसभेतील गटनेते आमदार बाळा नांदगावकर यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत सांगितले.
नरबळीसारखे प्रकार कुणी करीत असतील तर त्यांच्यावर कठोर कारवाई झालीच पाहिजे पण त्याचवेळी सर्वसामान्य माणूस विनाकारण त्रस्त होणार नाही याचीही काळजी घेण्याची गरज असल्याचे मत बाळा नांदगावकर यांनी व्यक्त केले.
आमच्या माहितीप्रमाणे या विधेयकानुसार उपवास करणेही गुन्हा ठरू शकते. हिंदू, मुस्लिम, जैन या धर्मांमध्ये उपवासाला महत्त्व आहे. त्याचप्रमाणे घरी वास्तुशांती सुरू असेल आणि शेजाऱ्याने जादूटोणा करीत आहे म्हणून तक्रार केली तर पोलिस अटक करतील. त्यामुळे याबाबत शासनाने भूमिका स्पष्ट करण्याची गरज असल्याचे ठाम मत नांदगावकर यांनी व्यक्त केले.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.