...तर हातभट्टीच्या दारूविक्रीवर बंदी नको - आठवले

दारूबंदी होणार नसेल, तर हातभट्टीच्या दारूविक्रीलाही परवानगी द्यावी, अशी मागणी रिपाइंचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी केली आहे.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Jan 28, 2013, 06:39 PM IST

www.24taas.com, चंद्रपूर
दारूबंदी होणार नसेल, तर हातभट्टीच्या दारूविक्रीलाही परवानगी द्यावी, अशी मागणी रिपाइंचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी केली आहे.

महाराष्ट्र शासनाचे दारूबंदी संदर्भातलं आजवरचं धोरण पाहता संपूर्ण दारूबंदी होणं अशक्य आहे. त्यामुळे शासनानं व्यसनमुक्ती कार्यक्रमावर भर द्यावा. आमचा दारूबंदीला पाठिबा आहे. मात्र देशी - विदेशी दारू विक्रीला शासन परवानगी देतं तर, हातभट्टीच्या दारूला बंदी घालते. त्यामुळे शासनाने संपूर्ण दारूबंदी करावी अन्यथा हातभट्टीच्या दारू विक्रीलाही परवानगी द्यावी असं वक्तव्य आरपीआय अध्यक्ष रामदास आठवले यांनी केलंय.
चंद्रपुर येथे बोलताना रामदास आठवले यांनी दारुबंदीसंदर्भात विधान केलं. संपूर्ण दारुबंदी अशक्य असल्य़ाचं दिसून येत आहे. त्यामुळे दारू विक्रीला परवानगी मिळणारच असेल, तर फक्त विदेशी दारूलाच का? हातभट्टीच्या दारूला का नाही? असा सवाल रामदास आठवलेंनी केला आहे.