तिरंगा फडकवण्यास मुस्लिम समाजाचा चांगला प्रतिसाद

येत्या प्रजासत्ताक दिनापासून राज्यातल्या मदरशांवर तिरंगा फडकताना दिसणार आहे. 

Updated: Jan 14, 2016, 10:06 PM IST
तिरंगा फडकवण्यास मुस्लिम समाजाचा चांगला प्रतिसाद title=

मुंबई : येत्या प्रजासत्ताक दिनापासून राज्यातल्या मदरशांवर तिरंगा फडकताना दिसणार आहे. संघपरिवारातल्या राष्ट्रीय मुस्लिम मंचातर्फे केलेल्या या आवाहनाला मुस्लिम समाजातूनही चांगला प्रतिसाद मिळतोय. 

मुस्लिम समाजात धार्मिक शिक्षण देण्यासाठी स्थापन झालेले मदरसे हे देशातील राजकारणात नेहमीच वादात राहिले आहेत. पण आता मदरशांच्या माध्यमातून मुस्लिम समाजात तिरंगा फडकावण्यासंबंधी आवाहन कऱण्यात आलंय. संघ परिवारातल्या राष्ट्रीय मुस्लिम मंचाने हे आवाहन केलंय.

काही मूठभर संघटना वगळता या आवाहनाला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. मंचाने हे आवाहन आज केलं असलं तरी मदरशांवर राष्ट्रध्वज फडकावण्याची परंपरा जुनी असल्याचं स्पष्ट करण्यात येतंय. फक्त मदरशांवरच नाही तर प्रत्येक मुस्लिमाने आपल्या घरावरही भारताचा ध्वज फडकवावा असं आवाहनही धर्मगुरूंनी केलंय. याला विरोध करणा-यांवर कारवाई करावी अशी मागणीही धर्मगुरूंनी केलीय.

राष्ट्रीय मुस्लिम मंचच्या या आवाहनावर राजकारण झालं तरी या माध्यमातून एका नव्य़ा परंपरेचा पायंडा पडणार हे मात्र नक्की.