www.24taas.com, झी मीडिया, नागपूर
वाढत्या तापमानासोबत नागपुरात गॅस्ट्रोच्या रुग्णांचं प्रमाण वाढलंय. दुषित पाण्याच्या पुरवठ्यामुळे गॅस्ट्रोच्या रुग्णांचं प्रमाण वाढलंय. नागपुरात तापमानात प्रचंड वाढ होत असतानाच गॅस्ट्रोच्या रुग्णांची संख्या देखील मोठ्या प्रमाणात वाढली आहे.
नागपुरात जानेवारीमध्ये 26, फेब्रुवारीत 30, मार्चमध्ये 45, एप्रिलमध्ये 58 आणि मे मध्ये आतापर्यंत 17 गॅस्ट्रोच्या रुग्णांची नोंद झालीय. सध्या रामबाग परिसरातल्या आयसोलेशन रुग्णालयात गॅस्ट्रोचे अनेक रुग्ण दाखल आहे.
दुषित पाण्यामुळे गॅस्ट्रोच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होतेय. त्यामुळे पाणी उकळून प्यावं, उघड्यावरील अन्नपदार्थ खाणं टाळावं असा सल्ला डॉक्टरांनी दिलाय. या रोग पासून स्वताचा बचाव करण्याकरता तज्ञांनी सांगितलेले उपाय तर सर्व सामान्य नागपूरकरांनी करायलाच हवे, पण या सोबतच नागपूर महानगर पालिकेच्या अधिकाऱ्यांनी या रुग्णालयात भरती होणाऱ्या रुग्णांची माहिती घेत दुषित पाण्याच्या स्त्रोतांची बंद करायला हवे. कारण तसे झाले तरच या रोगावर नियंत्रण मिळवता येईल.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.