www.24taas.com, झी मीडिया, नागपूर
अवघे दीडशे रुपये परत केले नाही म्हणून एका मित्राने आपल्या मित्राचा खून केल्याची धक्कादायक घटना नागपूर मध्ये उघड झाली. नागपूरच्या तहसील पोलिस स्टेशनच्या हद्दीतील भावसार मंगल कार्यालयाजवळ कचरा वेचणाऱ्या निलेश धुंडेच्या नावाच्या व्यक्तीची हत्या झाली होती. पोलिस तपासादरम्यान १५० रुपयाच्या उधारीवरूनच आपण निलेशची हत्या केल्याची कबुली आरोपींनी दिली आहे. या प्रकरणात २ आरोपींना अटक केली आहे.
गेल्या रविवारी नागपूरच्या तहसील पोलिस स्टेशनच्या हद्दीतील भावसार मंगल कार्यालयाजवळ कचरा वेचणाऱ्या निलेश उर्फ निल्या काशिनाथ धुंडे नावाच्या तरुणाची निर्घृण हत्या झाली होती. घटनास्थळावरून कुठलाही कुठलाही पुरावा मिळाला नसताना देखील तहसील पोलिसांनी या हत्याकांडाचा छडा लावण्यात यश आले. पोलिसांनी निलेशच्या हत्येच्या आरोपांखाली त्याचा मित्र सुरेश उर्फ भुऱ्या मनराखण शाहू आणि प्रमोद धांडे यांना अटक केली.
मृतक निलेश आणि आरोपी प्रमोद हे मित्र असून निलेशने प्रमोदकडून ५० रुपये आणि सुरेशकडून १०० रुपये उधार घेतले होते. उधार दिलेले पैसे परत मिळावे, या करिता सुरेशने नीलेशकडे तगादा लावला होता पण मृतक निलेश पैसे देण्यासाठी नेहमीच टाळाटाळ करत होता. त्यातूनच सुरेश,प्रमोद आणि निलेश वाद व्हायचा. अश्याच एका वादा दरम्यान दोघांनी निलेशची निर्घृण हत्या केली. पोलिसांनी दोघांची कसून चौकशी केली तेव्हा दोघांनी फक्त दीडशे रुपयांकरता निलेशची हत्या केल्याची कबुली दिली आहे.
मैत्रीला काळिमा फासणाऱ्या या घटनेने नागपूरकरांना मात्र सुन्न केले आहे. इतक्या शुल्लक कारणाकरता जीव घेणाऱ्या या आरोपींना कडक शिक्षेची मागणी आता होत आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.